ETV Bharat / bharat

तुतीकोरीनमधील 'त्या 'पिता-पुत्राच्या कुटुंबियांप्रती अभिनेता रजनीकांत यांच्या संवेदना

रजनीकांत यांनी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्स याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

रजनीकांत बातमी
रजनीकांत बातमी
author img

By

Published : Jun 28, 2020, 5:39 PM IST

चेन्नई - तुतीकोरीनीमध्ये पोलिसांच्या मारहाणीत पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर तामिळनाडूतील वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांतने मृतांच्या कुटुंबियांकडे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. कुटुंबियांशी रजनीकांतने फोनवर चर्चा देखील केली.

रजनीकांत यांनी मृत पी. जयराज यांच्या पत्नीशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या भावना कुटुंबियांसोबत असल्याचे सांगितले. रजनीकांत यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

तुतीकोरीनमधील संथलकुलम येथे जयराज आणि त्यांचा मुलगा फिनिक्स याला लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 23 जूनला ताब्यात घेतले होते. मोबाईलचे दुकान उघडल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या पितापुत्राला नंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात केले. उपचार चालू असताना दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचा छळ केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणी राज्यातील वातावरण पेटले असून पोलीसांच्या छळाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंबधी दोन पोलीस उपनिरिक्षकासह चौघांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष एल. मुरुगन यांनीही पीडितांना लवकर न्याय मिळावा, अशी आशा व्यक्त केला आहे. संथलकुलममधील घटना पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. दोषींविरुद्ध कडक कारवाई व्हावी, ही या क्षणाची गरज आहे. पीडित कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे मुरुगन यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.