ETV Bharat / bharat

लाॅकडाऊन: सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा... तांत्रिकाच्या कार्यक्रमाला जमले शेकडो नागरिक - राजस्थान

पोलिसांनी तांत्रिकाला जादूतोणा आणि त्यासारखे इतर प्रकार करण्यास बंदी घातली आहे. तसेच तांत्रिकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

suprestition
तांत्रिकाच्या कार्यक्रमाला जमले शेकडो नागरिक
author img

By

Published : Apr 5, 2020, 3:43 PM IST

बुंदी (राजस्थान)- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार लोकांनी घरी राहून गर्दी टाळणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील लखेरी या गावात एका तांत्रिकाने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावून ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे.

लखेरी येथे भोपा नावाच्या तांत्रिकाने गावातील एका मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काळ्या जादूच्या माध्यमातून मी तुम्हाला नौकरी मिळवून देऊ शकतो, तुमची प्रकृती ठिक करू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे प्रेम देखील मिळवून देऊ शकतो, अशी खोटी आश्वासने तांत्रिक भोपा याने ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून मंदिरातील काही लोक पळून गेले तर काही लोक भोपा सोबत मंदिरातच थांबले होते.

पोलिसांनी तांत्रिकाला जादूतोणा आणि त्यासारखे इतर प्रकार करण्यास बंदी घातली आहे. तसेच तांत्रिकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील रामनगर गावातही झाल आहे. येथे तीन तांत्रिक तलवारी घेऊन उभे होते. त्यांना पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी करून जमावबदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. धर्माच्या नावावर अशा प्रकारचे कृत्य संपूर्ण देशात होत आहे. या कृत्यांद्वारे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने अशा घटनांना आळा घालने गरजेचे आहे.

हेही वाचा- लॉकडाऊऩचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलबुर्गी पोलिसांची अनोखी शिक्षा, योगासने करायला लावून मेणबत्त्यांची दिली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.