नवी दिल्ली - दिवाळी काही दिवसांवरच आली असून दिवाळीच्या अगोदरच पश्चिम बंगालच्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने आनंदाची बातमी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये 696 उपनगरीय सेवा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भात टि्वट करून माहिती दिली आहे.
-
📣 Railways to run 696 suburban services in West Bengal from 11th November.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) November 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
With adequate safety measures in place, this will greatly enhance passenger convenience, ease of movement & facilitate smooth travel for the people.
">📣 Railways to run 696 suburban services in West Bengal from 11th November.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) November 8, 2020
With adequate safety measures in place, this will greatly enhance passenger convenience, ease of movement & facilitate smooth travel for the people.📣 Railways to run 696 suburban services in West Bengal from 11th November.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) November 8, 2020
With adequate safety measures in place, this will greatly enhance passenger convenience, ease of movement & facilitate smooth travel for the people.
पश्चिम बंगालमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद होती. त्याला आता परवानगी मिळाली आहे. प्रवासादरम्यान कोरोनासंबधित सर्व नियमांची काळजी घेतली जाणार आहे. तथापि, मुंबईकर अद्यापही लोकल सेवा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
रुग्ण संख्या -
पश्चिम बंगालमध्ये 35 हजार 88 सक्रिय रुग्ण असून 3 लाख 59 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 7 हजार 235 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 लाखांच्या पुढे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यातील 78 लाख 68 हजार 968 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 92.49 टक्के झाला आहे. भारत आणि नेपाळ देशांतील सबंध आणखी मजबूत करण्यासाठी काल (रविवारी) भारताने नेपाळला 28 आयसीयू व्हेंटिलेटर भेट दिले.