ETV Bharat / bharat

'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींचा सर्वोच्च न्यायालयात  बिनशर्त माफीनामा; म्हणाले . . .

काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे.

राहुल गांधींचे संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 8, 2019, 1:43 PM IST

नवी दिल्ली - चौकीदार चोर है या टीकेवरून राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेलप्रकरणी राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, असा जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी या अगोदरही गांधींनी दोन वेळा खेद व्यक्त केला आहे. मात्र आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला.

सर्वोच्च न्यायालयाने राफेलप्रकरणी सरकारला फटकारले होते. त्यानंतर न्यायालयानेही चौकीदार चोर है, यावर शिक्कामोर्तब केल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी निवडणुकीच्या गडबडीत वक्तव्य केल्याचे म्हणत खेद व्यक्त केला होता. मात्र भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देत याचिका दाखल केली होती.

Intro:Body:

'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाचा बिनशर्त माफीनामा; म्हणाले .  .

नवी दिल्ली - चौकीदार चोर है या टीकेवरुन राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेलप्रकरणी राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, असा जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी या अगोदरही गांधींनी दोन वेळा खेद व्यक्त केला आहे. मात्र आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला.

सर्वोच्च न्यायालयाने राफेलप्रकरणी सरकारला फटकारले होते. त्यानंतर न्यायालयानेही चौकीदार चोर है यावर शिक्कामोर्तब केल्याचे वक्तव्य राहुल गांधीनी केले. भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींनी निवडणुकीच्या गडबडीत वक्तव्य केल्याचे म्हणत खेद व्यक्त केला होता. मात्र भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देत याचिका दाखल केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.