नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज शिवजयंतीनिमित्त मराठमोळ्या भाषेत शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरवरून मराठीत शुभेच्छा देत आज सुखद धक्का दिला. या ट्विटच्या शेवटी त्यांनी #शिवाजीमहाराजकिजय हा हॅशटॅगही वापरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. असे ट्विट करत त्यांनी आपला मराठी अंदाज दाखवला.
पंतप्रधान मोदींसह इतर अनेक नेत्यांनी आज देशवासियांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. मागच्यावर्षी पंतप्रधान मोदींनीही शिवजयंतीच्या शुभेच्छा मराठीतूनच दिल्या होत्या.
Conclusion: