ETV Bharat / bharat

'महागाईमुळे जनता त्रस्त तर मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त' - राहुल गांधी लेटेस्ट न्यूज

महागाईमुळे जनता त्रस्त आहे आणि मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Jan 24, 2021, 3:32 PM IST

नवी दिल्ली - वाढत्या इंधन दरावरून केंद्र सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. महागाई वाढली आहे. सरकार फक्त कर वसूल करण्यात व्यस्त आहे, असे ते म्हणाले. जीडीपी 'म्हणजेच गॅस-डिझेल-पेट्रोलच्या किंमतींमध्ये मोदींनी प्रचंड वाढ केली आहे. महागाईमुळे जनता त्रस्त आहे आणि मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त आहे," असे गांधी यांनी ट्विट केले आहे.

तेल उत्पादक देशांमध्ये कोरोनाचा साथीच्या आजारामुळे इंधनाच्या किंमती वाढला असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं आहे. आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करावी लागेल. कोरोनाव्हायरसमुळे अनेक तेल उत्पादक देशांनी उत्पादन बंद केले किंवा ते कमी केले. मागणी आणि पुरवठ्यातील असमतोलपणामुळे इंधनाच्या दरावर दबाव आहे. असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

इंधन दरात वाढ -

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे. याचा सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 85.70 रुपये तर मुंबईत 92.28 एवढा दर आहे. तर मुंबईत डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहे. तर दिल्लीत ते 75.88 रुपये एवढे आहे.

राहुल गांधींचा तामिळनाडू दौरा -

तामिळनाडू विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत. यासाठी राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी तामिळनाडूच्या एरोड येथे त्यांनी रोड शो घेतला. दरम्यान तेथे उपस्थित लोकांना संबोधित करताना राहुल गांधींनी सरकारवर टीका केली. मी येथे काय करावे हे सांगण्यासाठी आलो नाही किंवा “मन की बात” बद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलो नाही. मी आपल्या समस्या ऐकण्यासाठी आणि निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.