नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्थलांतरित मजुरांचे मृत्यू व रोजगाराचे कमी झालेले प्रमाण यांचा सरकारवर काहीच परिणाम झाला नसल्याची त्यांनी टीका केली आहे.
-
मोदी सरकार नहीं जानती कि लॉकडाउन में कितने प्रवासी मज़दूर मरे और कितनी नौकरियाँ गयीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई?
हाँ मगर दुख है सरकार पे असर ना हुई,
उनका मरना देखा ज़माने ने,
एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई।
">मोदी सरकार नहीं जानती कि लॉकडाउन में कितने प्रवासी मज़दूर मरे और कितनी नौकरियाँ गयीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 15, 2020
तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई?
हाँ मगर दुख है सरकार पे असर ना हुई,
उनका मरना देखा ज़माने ने,
एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई।मोदी सरकार नहीं जानती कि लॉकडाउन में कितने प्रवासी मज़दूर मरे और कितनी नौकरियाँ गयीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 15, 2020
तुमने ना गिना तो क्या मौत ना हुई?
हाँ मगर दुख है सरकार पे असर ना हुई,
उनका मरना देखा ज़माने ने,
एक मोदी सरकार है जिसे ख़बर ना हुई।
टाळेबंदीतील स्थलांतिरत मजुरांच्या मृत्युची आणि गमाविलेल्या रोजगाराची आकडेवारी नसल्याचे लेखी उत्तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिले आहे. जर सरकारकडे आकडेवारी नसेल तर कोरोनाच्या संकटात टाळेबंदी लागू केल्यानंतर स्थलांतरित मजुरांचे मृत्यू झाले नाहीत का? अशी घणाघाती टीका केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मोदी सरकारला टाळेबंदीत किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला हे माहित नाही? किती जणांनी नोकऱ्या गमाविल्या हे माहित नाही? तुम्ही झालेल्या मृत्यूंची संख्या मोजली नाही का? वेदनादायी वस्तुस्थिती आहे, की मोदी सरकारवर कोणताच परिणाम झाला नाही. जगाने स्थलांतरित मजुरांचे मृत्यू पाहिले आहेत. फक्त मोदी सरकारला त्यांची माहिती मिळाली नाही.
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे.