ETV Bharat / bharat

अभिनंदन.. शंभर दिवसात विकास न केल्याबद्दल! राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

लोकशाहीचा विनाश आणि माध्यमांची गळचेपी सुरूच आहे. सरकारवरील टीका दाबून टाकण्यासाठी माध्यमांचा वापर चालू आहे - राहुल गांधी

राहुल गांधी
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:17 PM IST

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला आज(रविवार) शंभर दिवस पूर्ण झाले. यावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीनी भाजपवर जोरदार टीका केली. शंभर दिवसात काहीही विकास न केल्याबद्दल अभिनंदन, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्था ढासळत असल्यावरूनही त्यांनी मोदींनी लक्ष केले.

  • Congratulations to the Modi Govt on #100DaysNoVikas, the continued subversion of democracy, a firmer stranglehold on a submissive media to drown out criticism and a glaring lack of leadership, direction & plans where it’s needed the most - to turnaround our ravaged economy.

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकशाहीचा विनाश आणि माध्यमांची गळचेपी सुरूच आहे. सरकार विरोधी मते दाबून टाकण्यासाठी माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना सरकारकडे नियोजन आणि नेतृत्त्व दोन्हींची कमी आहे. अर्थव्यवस्थेकडे सर्वात जास्त लक्ष द्यायची गरज असताना तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे, अशा तिखट शब्दांत राहुल गांधीनी मोदी सरकारवर टीका केली. १०० दिवसात काहीही विकास झालेला नाही, असे ट्विट राहुल गांधीनी केले आहे.

मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक पुस्तक प्रकाशीत केले आहे. १०० दिवस धाडसी निर्णय, असे या पुस्तकाचे नाव आहे. मात्र, राहुल गांधीनी भाजपवर हल्ला बोल केला आहे. १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनीही भाजपवर टिका केली आहे. मागील आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.