ETV Bharat / bharat

राहुल गांधींची 'खेती बचाओ यात्रा' आज हरियाणामध्ये; सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका.. - राहुल गांधी हरियाणा यात्रा

कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसची खेती बचाओ यात्रा आज हरियाणामध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कृषी कायदे ते चीन अशा विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले..

Rahul Gandhi attacks on Govt over various issues before 'Kisan Bachao Yatra' in Haryana
राहुल गांधींची 'खेती बचाओ यात्रा' आज हरियाणामध्ये; सरकारवर विविध मुद्द्यांवरून केली टीका..
author img

By

Published : Oct 6, 2020, 2:41 PM IST

चंदीगढ : कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसची खेती बचाओ यात्रा आज हरियाणामध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कृषी कायदे ते चीन अशा विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले.

सध्याच्या अन्न सुरक्षा रचनेला पूर्णपणे नष्ट करणारे हे तीन कृषी कायदे आहेत. या कृषी कायद्यांमुळे पंजाबचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवर सरकारने केलेला हल्ला आहे, असे मत राहुल यांनी पटियालामध्ये व्यक्त केले.

  • The introduction of #FarmBills by Modi government is a way to destroy the existing structure of food security and it is going to affect the state of Punjab the most. It is an attack on our farmers: Congress leader Rahul Gandhi in Patiala. pic.twitter.com/3LX50Y7naq

    — ANI (@ANI) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हाथरसमधील कुटुंबाला सरकारच करतेय लक्ष्य..

हाथरस प्रकरणामध्ये त्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकार लक्ष्य करत आहे. मात्र, मोदींनी याप्रकरणी एक शब्दही काढला नाही. आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना हे सांगायचे होते की, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या लढाईमदध्ये ते एकटे नाहीत, हे त्यांना सांगण्यासाठी आम्ही हाथरसला गेलो, असे राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केले.

  • #WATCH Punjab: Congress leader Rahul Gandhi in Patiala speaks on #HathrasCase; says, "I wanted victim's family to know that they are not alone, we are there for them...The entire family was targetted by Uttar Pradesh administration, but our PM didn't say a word on the issue." pic.twitter.com/XnTFr6ukLM

मोदी सरकारने लघु-मध्यम उद्योग बंद पाडले..

लॉकडाऊनच्या काळात बंद होत चाललेल्या लघु-मध्यम उद्योगांना वाचवण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले हे उद्योग मोदींनीच नष्ट केले. मी याबाबत फेब्रुवारीमध्येच इशारा दिला होता, मात्र तेव्हा मला गांभीर्याने घेतले गेले नाही, असे राहुल म्हणाले.

  • Modi govt has destroyed small & medium businesses during the lockdown, which are the backbone of India's economy & gives employment to labourers. I had warned about #COVID19 in Feb but they said I was joking: Rahul Gandhi, Congress Leader on labourers' plight during the lockdown pic.twitter.com/YCMyJGwNKQ

तर, चीनबाबत बोलताना राहुल म्हणाले की, भारताचे पंतप्रधान केवळ आपल्या प्रतिमेबाबत विचार करतात, हे चीनला माहीत असल्यामुळेच चीन भारतावर हल्ला करण्याचे धाडस दाखवत आहे.

हेही वाचा : दिल्लीहून हाथरसला जाणाऱ्या चौघांना अटक, 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'शी संंबंधित असल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.