राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भातील पुनार्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राफेल व्यवहाराचे दस्तऐवज लीक होण्यावरून केंद्राने केलेल्या विशेषाधिकाराच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
सुनावणीदरम्यान महाधिवक्ता के. के. वेनुगोपाल म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेतून लीक पानांना काढण्याचे निर्देश द्यायला हवेत. कारण सरकार या दस्तऐवजांवर विशेषाधिकाराचा दावा करते.
यावर सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता वेनुगोपाल यांना सवाल केला, की आता आपण कोणत्या विशेषाधिकारासंदर्भात बोलत आहात ? ये संपूर्ण दस्तऐवज आधीच न्यायालयात दाखल झाले आहेत. यावर महाधिवक्ता म्हणाले, याचिकाकर्त्यांनी चोरी करून हे दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. त्या दस्तऐवजांना ग्राह्य धरून सुनावणी करू नये. नियमाप्रमाणे स्टेट डॉक्यूमेंट परवानगीशिवाय पब्लिश केले जाऊ शकत नाहीत.