ETV Bharat / bharat

३७० कलम रद्द केल्याने साधूबुवा खुश..! मोदींच्या दिर्घायुष्यासाठी 8 किलोमीटर लोटांगण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी एका साधूबुवाने ८ किलोमीटर लांब अंतर लोटांगण घातले. साधू महाराजांची परिक्रमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.

साधू
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:31 AM IST

पटना - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी एका साधूबुवाने ८ किलोमीटर लांब अंतर लोटांगण घातले. रायबरेलीतील नंगा तटपासून ते शिवालयपर्यंत ८ किलोमीटर अंतर साधुंनी लोटांगण घातले. उन्मेश चैतन्य असे परिक्रमा पूर्ण करणाऱ्या साधूचे नाव आहे. साधू महाराजांची परिक्रमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर साधूबुवांनी शिवायलचे दर्शन घेतले.

मोदींच्या दिर्घायुष्यासाठी साधु बुवांनी घातले ८ किलोमीटर लोटांगण

मंगळवारी सकाळी ६ वाजता महाराजांनी लोटांगण घालायला सुरुवात केली. सायंकाळी ६ वाजता त्यांनी ८ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. मोदींनी काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यामुळे मी प्रभावित झालो. त्यामुळे ही परिक्रमा करण्याचा संकल्प केल्याचे उन्मेश चैतन्य यांनी सांगितले.

रायबरेली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, तेथे मोदींच्या प्रशंसकांची संख्या कमी नाही. मोदींना दीर्घाआयुष्य लाभण्यासाठी साधू बुवांनी ही कठीण परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे परिसरामध्ये त्यांची चर्चा सुरू आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.