ETV Bharat / bharat

कोरोनासंबधीची संपूर्ण माहिती, वाचा एका क्लिकवर

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधून जगभर पसरलेला कोरोना विषाणू नेमका काय आहे, कोरोनाचा प्रादूर्भाव कसा रोखावा, तसेच कोरोनाशी कसे लढावे, यासंबधी विस्तृत चर्चा केली आहे ती लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे संचालक पीटर पायट यांच्याशी...

Q&A with Peter Piot about COVID-19
कोरोनासंबधीची संपूर्ण माहिती, वाचा एका क्लिकवर
author img

By

Published : Mar 24, 2020, 10:53 AM IST

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधून जगभर पसरलेला कोरोना विषाणू नेमका काय आहे, कोरोनाचा प्रादूर्भाव कसा रोखावा, तसेच कोरोनाशी कसे लढावे, यासंबधी विस्तृत चर्चा केली आहे ती लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे संचालक पीटर पायट यांच्याशी... टीईडीएमईडी फाऊंडेशनचे जय वालकर यांनी त्यांना कोरोनासंबधी काही प्रश्न विचारले. त्याची पिटर यांनी विस्तीर्ण स्वरुपात माहिती दिली आहे.

पिटर यांना विचारलेले १०० प्रश्न आणि त्याची उत्तरे -

1. टीईडीएमईडीः सुरूवात अगदी प्राथमिकपासून करू या. विषाणु काय असतो?

पीटर : विषाणु हा आरएनए किंवा डीएनए या जैविक संहितेचा अत्यंत लहान कण असून बाह्य प्रोटिनच्या आवरणाखाली संरक्षित असतो.

2. टीईडीएमईडीः विषाणु सामान्यपणे किती आढळतात?

पीटर - विषाणु अगदी सर्वत्र असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्व जगभरातील विषाणूंची तुम्ही बेरीज केली तर त्यांचे वजन जगातील सर्व जिवंत पदार्थांच्या वजनापेक्षा-वनस्पती, प्राणि आणि बॅक्टेरियांच्यासह-जास्त भरेल. १० टक्के मानवी जिनोम (पेशीविभाजनानंतर रंगसूत्रांचा एकच संच) डीएनए विषाणूपासून काढला जातो. पृथ्वी ही खरेतर विषाणूंचा ग्रह आहे.

3. टीईडीएमईडीः विषाणुचा प्रसार रोखणे इतके अवघड का असते?

पीटर - विषाणुचे कण इतके अविश्वसनीयरित्या लहान असतात की एका खोकल्याच्या अत्यंत लहान अशा तुषारातून अब्जावधी विषाणु वाहून नेले जाऊ शकतात.

4. टीईडीएमईडीः अगदी नेमकेपणे सांगायचे तर एखादा विषाणू किती लहान असतो?

पीटर - खूप लहान. अगदी नियमित सूक्ष्मदर्शकातून पाहिले तरीही तुम्ही विषाणू पाहू शकत नाही. एका टाचणीच्या डोक्यावर १० कोटी कोरोना विषाणुचे कण बसू शकतात. यावरून ते किती अविश्वसनीयरित्या लहान आहेत, ते समजून येईल.

5. टीईडीएमईडीः विषाणुचे कण काय करतात?

पीटर -विषाणुचे कण स्वतःला जिवंत पेशींमध्ये गुणाकार करण्यासाठी घुसवण्याचा प्रयत्न करतात, इतर पेशी आणि घरांमध्ये संसर्ग करतात.

6. टीईडीएमईडीः जिवंत पेशींमध्ये घुसण्याचा विषाणु का प्रयत्न करतात?

पीटर - विषाणू पुनरुत्पादन करतात. विषाणू परोपजीवींसारखे वर्तन करत असतात. अधिक विषाणू जबरदस्तीने पैदा करण्यासाठी ते जिवंत पेशींचे अपहरणच करतात. जेव्हा एखादी पेशीचे अपहरण केले जाते, तेव्हा विषाणू आपल्या स्वतःच्या शेकडो किंवा हजारो प्रति पाठवतात. परिणामी त्यामुळे अपहरण झालेली पेशी मरतेच.

7. टीईडीएमईडीः नव्या कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे, ज्याला वैज्ञानिकांनी सार्स-सीओव्ही२ असे नाव दिले आहे. याचा अर्थ काय?

पीटरःयाचा अर्थ असा आहे की सार्स सीओव्ही२ ने तुमच्या शरीरात पुनरुत्पादन करण्यास सुरूवात केली आहे.

8. टीईडीएमईडीःसार्स सीओव्ही २ आणि कोविड -१९ यात फरक काय?

पीटरःसार्स सीओव्ही२ हा विषाणू आहे;कोविड-१९ हा त्या विषाणुने पसरवलेला आजार आहे.

९.टीईडीएमईडीः जिवंत पेशीमध्ये विषाणुला प्रवेश करणे सोपे असते का?

पीटरः प्रथम पेशीमध्ये विशिष्ट विषाणू स्वीकारण्यासाठी संवेदी चेतातंतू आहेत का, त्यावर ते अवलंबून आहे. जसे एखादे कुलूप उघडण्यासाठी किल्लीला विशिष्ट छिद्र लागते तसेच हे आहे. बहुतेक विषाणु आपल्या प्रतिकारशक्तीमुळे अडवले जातात. आमच्या पेशींमध्ये विषाणूने प्रवेश करण्यासाठी योग्य संवेदी चेतातंतू नसतात. अशा तऱ्हेने, त्यांच्यापैकी ९९ टक्के विषाणु हे निरूपद्रवी असतात.

10. टीईडीएमईडीः किती प्रकारचे विषाणु अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी किती मानवांना हानिकारक आहेत?

पीटरःलाखो प्रकारच्या विषाणुंपैकी, केवळ काहीशे विषाणुच मानवाला हानिकारक असल्याचे माहित आहे. नवे विषाणु नेहमीच जन्म घेत असतात. बहुतेक निरूपद्रवी असतात.

11. टीईडीएमईडीः सरासरी, किती विषाणुचे कण आपल्याला संसर्ग होण्यासाठी आवश्यक असतात?

पीटरःसार्स-सीओव्ही२ पुरते तरी ते आपल्याला खरोखरच माहित नाही. पण सहसा अगदी थोडे कण पुरेसे असतात.

१२. टीईडीएमईडीः तो कसा दिसतो?

पीटरः सार्स-सीओव्ही २ विषाणु हा स्पॅघेट्टीच्या लहानशा धाग्यासारखा आणि एका चेंडूत गुंडाळल्यासारखा आणि प्रोटिनच्या कवचात घट्ट बसलेला असतो. या कवचाला अणकुचीदार काटे बाहेर आलेले असतात आणि

त्यामुळे तो सूर्यापासून निर्माण झालेले तेजोमंडळासारखा दिसतो. विषाणुंचे कुटुंब दिसण्यात सारखेच असते; ते सर्व सारखेच दिसतात.

१३. .टीईडीएमईडीः किती वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना विषाणु मानवांवर परिणाम करतात?

पीटरः मानवातून मानवात संक्रमित होणारे ७ प्रकारचे कोरोना विषाणु आहेत. ४ विषाणुंमुळे सौम्य सर्दी होते. पण उरलेले ३ भयानक आहेत. त्यात सार्स आणि मेर्सचा समावेश आहे आणि नवीन सार्स-सीओव्ही २ कोरोना विषाणु आहे.

१४. टीईडीएमईडीः त्याला नोव्हेल कोरोना विषाणु असे का म्हणतात?

पीटरः नोव्हेल याचा अर्थ मानवासाठी नवीन असा आहे. याचा अर्थ हा विशिष्ट विषाणु आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही. आमची रोगप्रतिकारक शक्ती २० लाख वर्षांपासून विकसित होत आहे. पण आमच्या शरिरांनी या प्रकारचा विषाणु अगोदर कधीही पाहिला नसल्याने, मानवांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित करण्याची संधीच नाही. प्रतिकारशक्तीचा अभाव आणि विषाणुची सहजपणे प्रसारित होण्याची क्षमता तसेच त्याची सापेक्ष प्राणघातकता, यामुळे सार्स-सीओव्ही २ चे आगमन इतके अस्वस्थ करणारे ठरले आहे.

१५. टीईडीएमईडीः नोव्हेल विषाणु किती नित्याने समोर येत असतो की आम्ही त्याची काळजी केली पाहिजे?

पीटरः ते क्वचितच घडणारे आहे. पण ते घडते. अशा आजारांना कारण ठरणारे एचआयव्ही, सार्स, मेर्स आणि आणखी काही विषाणु आहेत. हे पुन्हा घडणार आहे. नोव्हेल विषाणुचा उदय हा अतिशय मोठा प्रश्न आहे. तो लोकांमध्ये सहज पसरू शकतो आणि तो घातकही आहे.

१६. टीईडीएमईडीः नवीन विषाणु किती सहजपणे प्रसारित होतो?

पीटरः सार्स-सीओव्ही२ खोकला आणि स्पर्षातून सहजपणे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. हा श्वसनाद्वारे संक्रमित होणारा विषाणु आहे.

१७. टीईडीएमईडीः याशिवाय इतर कोणत्या मार्गाने हा विषाणु पसरू शकतो?

पीटरः अलीकडचे वृत्त असे आहे की तो मल आणि लघवीवाटेही पसरतो. पण त्याला अजून पक्का दुजोरा मिळालेला नाही.

१८. टीईडीएमईडीः हा नवीन विषाणु या अगोदरच्या सार्स आणि मेर्स पसवरणार्या माहित असलेल्या कोरोनाविषाणुंपासून कसा वेगळा आहे?

पीटरःसार्स-सीओव्ही२ हा अत्यंत महत्वाच्या अशा ४ मार्गांनी वेगळा आहे. पहिली गोष्ट, अनेक संसर्ग झालेल्या लोकांमध्य कित्येक दिवस लक्षणेच दिसत नाहीत. त्यामुळे ते नकळत इतरांना संसर्ग करू शकतात आणि कुणाला वेगळे करायचे, तेच आम्हाला माहित नाही. सार्स-सीओव्ही२ अत्यंत संसर्गजन्य असल्याने हे अतिशय चिंताजनक आहे. दुसरे, ८० टक्के वेळा, कोविड-१९ हा किरकोळ सर्दी किंवा खोकल्याप्रमाणे किरकोळ आजार वाटतो आणि त्यामुळे आम्ही स्वतःला विलग करत नाही आणि त्यातून इतरांना संसर्ग करतो. तिसरे, कोरोनाची लक्षणे ही फ्ल्यूसारखीच असतात आणि त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. लोकांना वाटते की आपल्याला फ्ल्यू झाला आहे आणि ते इतर शक्यता विचारात घेत नाहीत. चौथे, आणि कदाचित सर्वात महत्वाचे, हा विषाणु मानवातून मानवाकडे सहजपणे पसरतो कारण तो सुरूवातीच्या अवस्थेत, तो घशाच्या वरच्या भागात रहातो. आमचा घसा अब्जावधी संसर्गजन्य कणांनी भरलेला असतो आणि म्हणून आम्ही जेव्हा खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा अब्जावधी कण हुसकावून लावले जातात पण ते दुसर्याकडे संक्रमित होतात.

१९. टीईडीएमईडीः मला वाटले की विषाणुमुळे न्यूमोनिया होतो? त्यात घशाचा कितपत सहभाग आहे?

पीटरःहा आजार नेहमी घशात सुरू होतो आणि जशी प्रगती करतो तसा तो फुफ्फुसात खाली सरकतो आणि श्वसनाच्या संसर्गात रूपांतर होते.

२०. टीईडीएमईडीः मी लक्षणे नसलेला हा शब्द अनेकदा ऐकतो. त्याचा अर्थ काय?

पीटरःत्याचा साधा अर्थ हा आहे की त्याची लक्षणे दिसत नाहीत.

२१. टीईडीएमईडीः तुम्हाला असे म्हणायचे आहे का एखाद्याला नव्या विषाणुचा संसर्ग झाला आणि तो कधीच लक्षणे दाखवत नाही?

पीटरःदुर्दैवाने ते खरे आहे. पहिले काही दिवस अनेक संसर्गग्रस्त लोक रोगाची लक्षणेच दाखवत नाहीत. नंतर सौम्य खोकला किंवा साधा ताप दिसतो. सार्सच्या विरोधात हे आहे, जेथे तुम्हाला काही दिवसांपर्यंत स्पष्ट लक्षणे दिसतात जेव्हा आजारी असतानाच संक्रामक असतो.

२२. टीईडीएमईडीः जर तुमच्यात लक्षणे नसतील तरीही, तुम्ही इतर लोकांना संसर्ग करू शकता?

पीटरः दुर्दैवाने, हो. आणि तेच प्रसार रोखणे अतिशय अवघड बनवते.

२३. टीईडीएमईडीः लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून वैज्ञानिक लस विकसित करण्याची कितपत शक्यता आहे?

पीटरः तशी शक्यता अगदी संयुक्तिक आहे, पण आपल्याकडे लस असेल, याचीही आम्हाला काही खात्री नाही. अपयश शक्य आहे. उदाहरणार्थ, ३५ वर्षांपासून आम्ही एचआयव्ही लस शोधत आहोत आणि तरीही आमच्याकडे ती नाहीच. सार्स-सीओव्ही२साठी आम्ही लस विकसित करू, याबाबत मी आशावादी आहे. पण तिची परिणामकारकता आणि सुरक्षा यासाठी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात परिक्षा करावी लागणार आहे, ज्यासाठी भरपूर लोक आणि वेळ लागणार आहे.

२४. टीईडीएमईडीः समजा आपण गृहित धरू की कोरोना विषाणुसाठी लस शक्य आहे आणि आणखी पुढे असेही गृहित धरू की ती लस आपल्याला अगदी चटकन सापडली आहे. आमच्याकडे ही लस आल्यावर लाखो लोकांना आपण किती काळानंतर देण्यास सुरूवात करू?

पीटरः येत्या एक ते दोन महिन्यात आपल्याला लसीसाठी उमेदवार मिळतील. पण ती संरक्षण करते आणि सुरक्षित आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला व्यापक परिक्षा करण्याची गरज असल्याने प्रमुख नियामक संस्थेने ती मंजूर केल्यावर लोकांमध्ये ती घुसवण्यासाठी किमान एक वर्ष तरी लागेल. खरेतर, लाखो डोस तयार करेपर्यंत आम्हाला १८ ते २४ महिने लागतील आणि हा फक्त आशावाद आहे.

२५. टीईडीएमईडीः ही जर आणिबाणीची परिस्थिती असेल तर लस विकसित करण्यास इतका उशिर का लागेल?

पीटरः जरूरी नाही की, लस सापडण्यास इतकाच काळ लागेल. पण लसीची परिक्षेला उशिर लागू शकतो. एकदा प्रयोगशाळेत उमेदवार लस अस्तित्वात आली की, चिकित्साविषयक चाचण्यांची मालिकांची गरज आहे. प्रथम प्राण्यांवर आणि नंतर यशस्वीपणे लोकांच्या मोठ्या समूहांवर तिची परिक्षा केली जाईल.

२६. टीईडीएमईडीः आम्ही अगोदरच प्रगती केली आहे का?

पीटरःचांगली बातमी ही आहे की सार्स-सीओव्ही२ च्या शोधानंतर आणि विलगीकरणानंतर, जे जानेवारी २०२० मध्ये घडले, काही आठवड्यांनीच लस विकसित करण्यास सुरूवात झाली आहे. अनेक सरकारांनी निधी दिला आहे आणि अनेक कंपन्या आणि जगभरातील वैज्ञानिकांनी अत्यंत तातडीने त्यावर काम सुरू केले आहे.

२७. टीईडीएमईडीः या देशांतील वैज्ञानिक सहकार्य करत आहेत की आपसात स्पर्धा करत आहेत?

पीटरः काही प्रमाणात दोन्हीही सुरू आहे आणि ते काही वाईट नाही. पण आंतरराष्ट्रीय सहकार्य सर्वसाधारणपणे चांगले आहे. हे उत्साहवर्धक आहे.

२८. टीईडीएमईडीः अत्यंत जलदगतीने आम्ही लस विकसित करू शकत नाही का?

पीटरः दुर्दैवाने, त्यात काही शॉर्टकट्स नाहीत. मानवी शरिराची प्रतिकारशक्ती प्रणाली ही गुंतागुंतीची आहे आणि तिचा अंदाज लावता येत नाही. रोगाचे उत्परिवर्तन होण्याची शक्यता असते. मुले मोठ्यांपासून वेगळी असतात. प्रत्येक जणाला जो ती लस घेतो, ती १०० टक्के सुरक्षित आहे, याची खात्री आपल्याला करावी लागते. ते साध्य करण्यासाठी, काळजीपूर्वक मापलेल्या अवस्थांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्यसंपन्न मानवी स्वयंसेवकांवर औषधे आणि लसी विविध डोसमध्ये देऊन तिची परिक्षा करावी लागते.

२९. टीईडीएमईडीः नवा विषाणु किती भयानक आहे?

पीटरः अनेक वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की जितक्या लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी १ ते २ टक्के लोकांना तो ठार मारतो. डब्ल्यूएचओने ताज्या अहवालात ३ टक्के इतका जास्तीचा आकडा दिला आहे, परंतु हा अंदाज खाली येण्याची शक्यता आहे कारण संसर्ग झालेले पण माहित न होऊ शकलेले अनेक रूग्ण आहेत तसेच सौम्य लागणीचे रूग्ण आहेत, त्यांची मोजदाद कशी करायची, याचे काम सुरू आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये तसेच मूलगामी अवस्थांमधील रूग्णांमध्ये याचा मृत्युदर अगदी स्पष्टपणे उच्च आहे.

३०. टीईडीएमईडीः सरासरी मृत्युदराच्या आकड्यावर फोकस केला पाहिजे का?

पीटरःतशी काही खरेच गरज नाही. तुम्ही सरासरी ३ इंच पाण्यातही बुडू शकता. व्यापक पल्ल्यातील परिणामांसह काही विशिष्ट लोकांच्या समूहांसाठी तो विषाणु भयानक आहे आणि दुसर्या समूहाच्या लोकांसाठी तो तितकासा भयानक नाही- हे ओळखणे हे जोखमीला समजून घेण्याचा जास्त चांगला मार्ग आहे.

३१. टीईडीएमईडीः मग फोकस करण्यासाठी आकडे आणि तपासणीचे मुद्दे काय आहेत?

पीटरः८० टक्के वेळा तो अगदी किरकोळ आजार आहे, पण २० टक्के प्रकरणांमध्ये तो अधिक तीव्र बनतो, आणि सर्वाधिक वाईट म्हणजे उच्च ताप किंवा श्वास कमी पडतो. याच्या परिणामी काही लोकांना रूग्णालयात दाखल व्हावे लागते आणि काहींना काही महत्वाचे दिवस जगण्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. जेव्हा त्यांच्या फुफ्फुसांमध्ये व्यापक संसर्ग झालेला असतो.

३२. टीईडीएमईडीः कोणत्या समूहाच्या लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे?

पीटरःसर्वप्रथम, माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तींनाःमाझे वय ७१ आहे. जितके तुम्ही वृद्ध असाल, तितका तुम्हाला याचा धोका जास्त आहे. तसेच ज्यांना मूलगामी स्वरूपाचे आजार आहेत जसे की मधुमेह, जुनाट अडथळा आणणारा फुफ्फुसाचा विकार असलेले, फुफ्फुसाचा विकार किंवा ह्रदयविकार असलेले किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना धोका जास्त आहे.

३३. टीईडीएमईडीः कोणत्या प्रकारच्या धोक्याला हे उच्च जोखिम असलेले समूह सामोरे जातात?

पीटरःत्यांचा मृत्युदर हा १० किंवा अगदी १५ टक्के इतका उच्च असू शकतो. तुम्हाला जेव्हा जास्त आरोग्याच्या तक्रारी असतील तेव्हा तुमची जोखिमही वाढते. वेबवर याची ताजी वैज्ञानिक माहिती नियमितपणे टाकली जाते.

३४. टीईडीएमईडीःम्हणजे तुम्हाला जर इतर आजार असतील जसे की मधुमेह, तुमचा धोका वाढतो. का?

पीटरः कारण तुमची प्रतिकारशक्ती कोणत्याही संसर्गजन्य विषाणुला, विशेषतः या विषाणुला क्षीण प्रतिकार करते.

३५. टीईडीएमईडीः असे दिसते की सर्वसाधारणपणे, मुले आणि तरूण लोकांना अगदीच झाला तर याचा सौम्य परिणाम होतो. हे खरे आहे का?

पीटरःतसे दिसते आहे खऱे. पण कोविड-१९ चे इतर अनेक मुद्दे आहेत, याला पक्का दुजोरा अद्याप मिळायचा आहे.

३६. टीईडीएमईडीः जर हे खरे असेल तर, सार्स-सीओव्ही२ वृद्ध लोकांवरच जास्त परिणाम का करतो, पण तरूण आणि मुलांवर परिणाम करत नाही?

पीटरः आम्हाला खरेतर माहित नाही. आम्ही त्याचा हिशोब लावत आहोत.

३७. टीईडीएमईडीः त्यात काही वेगळे आहे का?

पीटरःतुमच्यात जरी रोगाची लक्षणे दिसत नसली तरीही तुम्हाला चांगले वाटत असेल तरीही तुम्ही इतरांना संसर्ग करू शकता. हेच वेगळे आहे, पण हे एचआयव्ही संसर्गाच्या बाबतीतही घडू शकते.

३८. टीईडीएमईडीः कोविड-१९ ची तुलना आम्ही हंगामी फ्ल्यूशी केली गेलेली नेहम ऐकतो. ही तुलना चौकटीत बसवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? उदाहरणार्थ, हंगामी फ्ल्यू आणि कोरोना विषाणु सारखेच धोकादायक आहेत का?

पीटरः अमेरिकेत हंगामी फ्ल्यू दरवर्षी ठराविकपणे ३ कोटी लोकांना होतो. त्यापैकी एक दशांश म्हणजे १ टक्के लोक मरतात. तरीही तो आकडा मोठाच आहे. जगभरात, वर्षाला सरासरी, हंगामी फ्ल्यूने एकूण ३ लाख लोक मरतात. सरासरीच्या आधारे, नवीन कोरोना विषाणु हा १० ते २० टक्के जास्त भयानक आहे आणि फ्ल्यूच्या विपरित, लसीकरणाच्या माध्यमातून त्याच्यापासून आम्ही आमचे संरक्षण करू शकत नाही.

३९. टीईडीएमईडीः नवीन विषाणु फ्ल्यूप्रमाणे सहजपणे पसरतो का?

पीटरः नवीन विषाणु फ्ल्यूप्रमाणेच सहजपणे पसरतो असे दिसते.

४०. टीईडीएमईडीः फ्ल्यू आणि कोविड-१९ ची तुलना सुरूच ठेवताना, तो होण्यामागील कारणांबाबत काय?फ्ल्यूही विषाणुमुळेच होतो का?

पीटरःहो. फ्ल्यू इन्फ्ल्यूएंझा विषाणुमुळे होतो. पण इन्फ्ल्यूएंझा विषाणु आणि कोरोना विषाणु वेगळे आहेत. फ्ल्यूच्या लसीमुळे नवीन कोरोना विषाणुपासून बचावण्यासाठी मदत होणार नाही, पण फ्ल्यू होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर टळतो. साध्या सर्दीला, लस किंवा उपचार नाही, ती नेहमी दुसर्या एका प्रकारच्या लहान विषाणुमुळे ह्रिनोव्हायरस आणि प्रसंगी दुसर्या कोरोना विषाणुमुळे होते.

४१. टीईडीएमईडीः नवीन कोरोना विषाणुने शरिरात प्रवेश केला की त्याची संसर्गाची प्रगती कशी होत जाते?

पीटरःसहसा संसर्ग खोकल्याने सुरू होतो. नंतर सौम्य ताप येतो. सौम्य तापाचे रूपांतर उच्च तापात होते आणि तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो.

४२. टीईडीएमईडीः कोणत्या टप्प्यावर चांगली वैद्यकीय काळजी जीवन आणि मृत्यु यातील फरक करते?

पीटरः सहसा जेव्हा तुमचा ताप उच्च असतो तेव्हा आणि तुमच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले असेल जेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो, किंवा तुम्हाला श्वास घ्यायला मदतीची गरज असते तेव्हा.

४३. टीईडीएमईडीः गोवर, गालगुंड किंवा चिकन पॉक्स या आजारांपासून नवीन विषाणु किती वेगळा आहे?

पीटरःसार्स-सीओव्ही२ हा खूप कमी संसर्गजन्य आहे. पण अजूनही आपल्याला त्याबाबत फारसे काही माहित नाही.

इतर आजारांबाबत भरपूर माहिती मिळाली आहे.

४४. टीईडीएमईडीः जर नवीन कोरोना विषाणु इतर विषाणुंपेक्षा कमी घातक आहे, तर अनेक लोक त्याला इतके घाबरले का आहेत?

पीटरःकारण ज्या नव्या गोष्टी आम्हाला ठार करू शकतात किंवा आजारी पाडतात, त्या आपल्याला खूपच निराश करतात.पण अचूक ज्ञान हाच भीतीवरचा उतारा आहे. म्हणून मी तुम्हाला अमेरिकेत CDC.gov या वेबसाईटकडे लक्ष देण्याचे आवाहन करत आहे. इतर देशांमध्ये तुमच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाकडे किंवा डब्ल्यूएचओ वेबसाईटकडे जा.

४५. टीईडीएमईडीःलोकांनी किती वेळा सीडीसी किंवा डब्ल्यूएचओ वेबसाईट किंवा त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवावे?

पीटरः आम्हाला जशा नव्या विषाणुबाबत माहिती मिळते तसे आम्ही सातत्याने आपले ज्ञान अद्ययावत करत असतो. यामुळे या साईटला वारंवार भेट द्यायला हवी.

४६. टीईडीएमईडीः मानवजातीने एखादा विषाणु कायमचा नष्ट केला आहे का?

पीटरःहो. देवी म्हणजे स्मॉल पॉक्स जो पूर्वी लाखो लोकांना मारत असे. गेट्स फाऊंडेशन आणि जगातील अमेरिकेसारख्या अनेक सरकारांमुळे पोलिओही आता जवळपास त्या अवस्थेच्या जवळ पोहचला आहे.पूर्वी प्लेग किती भयंकर आजार होता, तेही आपण विसरता कामा नये.

४७. टीईडीएमईडीःनवीन विषाणु नवनव्या देशांमध्ये जगभर पसरतो कसा?

पीटरः रस्ता, हवा आणि पाण्याच्या मार्गाने. विषाणु आजकाल विमानानेही प्रवास करू लागले आहेत. काही प्रवासी सार्स-सीओव्ही२ धारण करू शकतात.

४८. टीईडीएमईडीः म्हणजे, प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्या विषाणुसाठी स्वागताची पायघडी आहे?

पीटरः सत्य हे आहे की सार्स-सीओव्ही२ अमेरिकेसह बहुतेक देशांमध्ये ठामपणे अस्तित्वात आहे आणि कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दूर आहे.

४९. टीईडीएमईडीःचीनमध्ये साथ सुरू झाल्यापासून, त्या देशाला भेट देऊन येणारे अमेरिकेत कोरोना विषाणु आणणारे सर्वात मोठा धोका आहेत का?

पीटरः

चीनमध्ये २०१९ मध्ये नवीन विषाणुचा उदय झाल्यापासून, अमेरिकेत सर्व जगभरातून २ कोटी लोक आले आहेत. अमेरिकेने ४ आठवड्यांपूर्वी चीनमधून येणारी बहुतांशी थेट उड्डाणे रद्द केली. परंतु त्यामुळे विषाणुचा प्रवेश रोखता आला नाही. आता चीनमधील कोविड-१९चे नवीन रूग्ण हे नेहमी इतर देशातून आलेले आहेत कारण चीनमध्ये सध्यातरी साथ आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे.

५०. टीईडीएमईडीःदुसर्या शब्दांत, प्रमुख विमानतळांनी तुम्हाला कोणत्याही देशांत विषाणु तीन महिन्याच्या आत असेल, अशी हमी द्यावी.

पीटरःहो.मला वाटतं अमेरिकेत तुम्ही म्हणता, घोडा धान्याचे कोठार सोडून गेला आहे.(बैल गेला आणि झोपा केला) मात्र संपूर्ण प्रवास थांबवण्याचे हे कारण नाही.

५१. टीईडीएमईडीः जपानसारख्या देशाने शाळा का बंद केल्या असाव्यात?

पीटरःइटाली आणि फ्रान्सनेही तेच केले आहे. कारण वैज्ञानिकांना मुले जी विषाणुची वाहक आहेत, त्यांनी त्याचा प्रसार कितपत केला आहे, हे माहित नाही. जपान त्याचा प्रसार संथगतीने करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम करत आहे. मुले सहसा आपले हात धुवत नाहीत किंवा अधिक वैयक्तिक हायजिन वापरत असल्याने मुले खूप लवकर विषाणुचा प्रसार करतात. फ्ल्यू कसा पसरतो यात मुले फार मोठी भूमिका बजावतात, यामुळे अनेक देशांनी प्रभावग्रस्त भागांमध्ये शाळा बंद केल्या आहेत.

५२. टीईडीएमईडीः मला जर त्याचा संसर्ग झाला तर, विषाणुला कमी तीव्र बनवण्यासाठी औषधे आहेत का, किंवा त्याने संपूर्णपणे निघून जावे, असे करता येईल?

पीटरःउपचारासाठी कोणतेही औषध किंवा डॉक्टर ज्याला रोगनिवारणाची उपचारपद्धती म्हणतात ती प्रभावी सिद्ध झाले नाही. रोगनिदान चाचण्यांमध्ये विविध औषधांची चाचणी घेण्यात येत आहे, त्यामुळे लवकरच चांगला बदल होणार आहे, अशी आशा करू या.

५३. टीईडीएमईडीःनवीन उपचारपद्धतीची औषधे येण्याची कितपत शक्यता आहे आणि किती लवकर?

पीटरः मला असा विश्वास आहे की येत्या दोन महिन्यांच्या आत, सध्याच्या औषधांचे इतर उपयोग सापडतील आणि त्यामुळे संसर्गग्रस्त व्यक्तिवर उपचार करण्यास त्यांची मदत होईल. दुसर्या शब्दांत, सध्याच्याच औषधांचा आपल्याला नवीन उपयोग सापडेल जे मूलतः एचआयव्हीसारख्या इतर संसर्गजन्य आजारांसाठी वापरले जात होते. त्याला वेळ लागेल आणि अनेक परिक्षा कराव्या लागणार आहेत. नवीन उपचारपद्धतीची खात्री करण्यासाठी औषधांची चिकित्साविषयक चाचण्या विशेषतः चीनमध्ये आणि इतरत्रही सुरू आहेत. ते आशादायक वाटत आहे.

५४. टीईडीएमईडीः प्रतिजैविके काय आहेत?

पीटरःप्रत्येक जण संकटात त्यांच्याकडे वळतो.हा नवीन विषाणु आहे. बॅक्टेरिया नाही. प्रतिजैविके केवळ बॅक्टेरियाविरोधात काम करतात पण ते विषाणुंविरोधात काहीही करत नाहीत. रूग्णालयीन उपयोगासाठी बॅक्टेरियामुळे झालेले दुय्यम संसर्गावर ते उपयुक्त ठरू शकतील, पण प्रतिजैविके नव्या विषाणुवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकत नाहीत.

५५. टीईडीएमईडीः सर्व नव्या प्रकारचे उपचार आणि उपचार पद्धतीबाबत काय ज्याबद्दल मी इंटरनेटवर ऐकले आहे.

पीटरः न संपणारे चुकीचे दावे केले जात आहेत. जर त्यांच्याबाबत तुम्ही अनेक विश्वासार्ह वेबसाईट्सवर वाचले तर, ते काही खरे विज्ञान आहे, असे तुम्हाला वाटू शकते. पण बहुतेक जे काही ऐकता ते निव्वळ थोतांड असते, म्हणून अगदी काळजीपूर्वक रहा आणि अपुष्टीकृत अफवा पसरवू नका.

५६. टीईडीएमईडीः मास्क्सबद्दल काय? निळ्या रंगाचे सर्जिकल मास्क किंवा एन नाईंटी फाईव्ह फेसमास्क उपयुक्त आहेत का?

पीटरःमास्क्सचा अत्यंत मर्यादित उपयोग आहे. फक्त काही विशिष्ट परिस्थितीत ते उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, एन ९५ मास्कबाबत, केवळ ५० टक्क्यांच्यापेक्षा आत जाणारे विषाणुचे कण बाहेर टाकले जातील, पण ते हवेतील आलेल्या तुषारांचा प्रसार कमी करू शकतात.

५७.मास्क योग्य रित्या घातले तर त्यांचे काय फायदे आहेत आणि कुणी हे मास्क लावले पाहिजेत?

पीटरःसर्वोत्कृष्ट मास्क्स, काळजीपूर्वक बनवले आणि योग्य रित्या परिधान केले तर, आजारी लोकांच्या खोकल्यामुळे होणार्या विषाणुच्या प्रसाराची गती मंद करतात. याचा अर्थ, मास्क तुमचे इतरांपासून संरक्षण करण्यासाठी नाही, तर इतरांचे तुमच्यापासून संरक्षण करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्दी आहे आणि तुम्ही खोकायला सुरूवात करता, तेव्हा तुम्ही मास्क घातला असेल तर इतरांप्रति सौजन्य आहे. मास्कचा अतिरिक्त लाभही आहे: तुम्ही आपल्या चेहर्याला स्पर्ष करण्याची शक्यता ते कमी करतात, म्हणून

जर तुमच्या हातावर विषाणु असेल तर, तुम्ही तो शरिरात त्याचे संक्रमण करण्याची शक्यता कमी होते. मास्क आरोग्यसेवा कर्मचार्यांना लाभ देतात. तुम्ही जर एखाद्या आरोग्यसेवा आस्थापना किंवा वृद्धाश्रमात काम करत असाल तर, मास्क अनिवार्य आहेत.

५८. टीईडीएमईडीः जागतिक महामारीच्या उद्रेकात संसर्ग होऊ नये म्हणून मी काही करू शकतो का?

पीटरःवारंवार हात धुणे, तुमच्या चेहर्याला स्पर्ष न करणे, हाताच्या कोपर्यात किंवा कागदी रूमालात खोकणे आणि शिंकणे, कुणाशीही हस्तांदोलन किंवा मिठी न मारणे यामुळे धोका कमी होतो. जर तुम्ही आजारी असाल तर घरीच थांबा आणि पुढे काय करायचे आहे यासाठी फोनवरून डॉक्टरचा सल्ला घ्या. इतर लोकांना भेटताना मास्क घालून रहा.

५९. टीईडीएमईडीःशमन म्हणजे काय?

पीटरः वैज्ञानिक हा शब्द वापरताना पुष्कळ ऐकले आहे. शमन याचा अर्थ विषाणुच्या प्रसाराची गति कमी करणे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा,सार्वजनिक जीवन आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम मर्यादित करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. पण लस निघेपर्यंत, आम्ही त्याची प्रसाराची गति कमी करू शकतो. ते खरोखरच महत्वाचे आहे.

६०. टीईडीएमईडीः विषाणुच्या प्रसाराची गति कमी करण्यासाठी आम्ही आणखी काय मार्ग वापरू शकतो?

पीटरःचांगले हायजिन आणि सामायिक सौजन्य यामुळे आपण त्याची गति कमी करू शकतो. त्याशिवाय,सामाजिक अंतर राखण्याचे उपाय-जसे की घरून काम करणे, विमानात न बसणे, शाळा बंद करणे आणि मोठ्या समारंभांवर बंद-यामुळे सार्स-सीओव्ही२च्या प्रसाराला आळा बसू शकतो.

६१. टीईडीएमईडीःवेगवेगळे विषाणु इतरांपेक्षा सहजपणे पसरतात का?

पीटरःहो.गोवर हा सर्वात वाईट आहे. एखाद्या गोवरग्रस्त माणसाने दोन तासांपूर्वी खोली सोडली असेल आणि तुम्ही त्या रिकाम्या खोलीत गेलात तर तुम्हाला गोवर होऊ शकतो. म्हणून लसीकरणाचा दर खाली जातो तेव्हा आपल्याकडे गोवराच्या साथीचा उद्रेक होतो. हा अत्यंत अवघड आजार आहे. नेहमीची सर्दी अगदी सहजपणे पसरते. एचआयव्हीचा प्रसार होण्यास खूप अवघड आहे आणि तरीही आपल्याकडे त्यामुळे ३ कोटी २० लाख मृत्यु झाले आहेत.

६२. टीईडीएमईडीः हा विषाणु थांबवण्यासाठी काय करावे लागेल?

पीटरः कुणालाच ते खात्रीपूर्वक माहित नाही, पण चीनने त्याचा प्रसार महत्वपूर्णरित्या थांबवणे शक्य आहे, हे दाखवून दिले आहे. सार्स-सीओव्ही२ संपूर्णपणे उखडून काढण्यास लसीची गरज असू शकते.

६३. टीईडीएमईडीः अमेरिकेसारख्या लोकसंख्या असलेल्या देशात नव्या विषाणुला पसरायला किती काळ लागेल?

पीटरः चांगल्या हायजिनच्या सामान्य उपायांसह त्याला पसरू दिले तर, सार्स-सीओव्ही२ प्रत्येक आठवड्याला संसर्गग्रस्तांची लोकसंख्या दुप्पट करतो. याचा अर्थ ५० लोक जर संसर्गग्रस्त झाले असतील तर १४ आठवड्यात तो १० लाख लोकांना संसर्ग करू शकतो. हे त्याच्या संसर्गाचे सोपे गणित आहे. अर्थात, त्याची गति मंद करण्यासाठी आम्ही काही गोष्टी करू शकतो.

६४. टीईडीएमईडीः कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी चांगली स्वच्छता कितपत परिणामकारक आहे? लोकांनी जर मार्गदर्शक तत्वांचे पालन केले तर संसर्गग्रस्त लोकांची संख्या लक्षणीयरित्या कमी होईल का?

पीटरःलोक किती काळजी घेतात त्यावर संख्या अवलंबून आहे आणि अगदी लहान बदलही संपूर्ण आवश्यकतेपेक्षा जास्त आरोग्यसेवा प्रणालीवर तणाव टाळण्याच्या दृष्टिने महत्वाचे आहेत.

६५. टीईडीएमईडीःआमच्या लोकसंख्येत काही हजार रूग्णांची प्रकरणे लपवता येतील का? ते कसे शक्य होईल?

पीटरःदरवर्षी लाखो फ्ल्यूचे रूग्ण असतात. यावर्षी, त्यापैकी काही केसेस या प्रत्यक्षात कोविड-१९च्या होत्या. त्याशिवाय, अनेक संसर्गग्रस्त लोक काहीच लक्षणे दाखवत नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे दाखवतात. म्हणून ते साध्या नजरेपासून लपवत आहेत.

६६. टीईडीएमईडीःपरिक्षा पॉझिटिव्ह आली म्हणजे नेमका काय अर्थ आहे?

पीटरःत्याचा अर्थ असा आहे की संवेदनशील परिक्षा केल्यानंतर असे निष्पन्न झाले की त्या व्यक्तिच्या शरिरातील द्रवांमध्ये विषाणुची उपस्थिती आहे.

६७. टीईडीएमईडीः प्रत्येकाची परिक्षा लवकरात लवकर केली जावी का?

पीटरःकोविड-१९ ची परिक्षा खूप जास्त व्यापक प्रमाणात उपलब्ध केली पाहिजे कारण कोण संसर्गग्रस्त आहे आणि समुदायात विषाणु कसा पसरतो, याची आम्हाला अजूनही पुरेशी माहिती नाही. महत्वाच्या ड़ेटा अभ्यासावयाचा असल्याने

आम्हाला अधिक परिक्षांची आवश्यकता आहे.

६८. टीईडीएमईडीः दक्षिण कोरियाने परिक्षेची ड्राईव्ह थ्रु प्रणाली का स्थापन केली?

पीटरः दक्षिण कोरियाने ही प्रणाली विकसित यासाठी केली आहे की ते साथीच्या उद्रेकाची गति मंद करण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घेत असून प्रत्येक संसर्गग्रस्त व्यक्तिला शक्य तितक्या गतिने ते शोधत आहेत.

६९. टीईडीएमईडीःलोकांनी कोणत्या मुख्य लक्षणाचा शोध घेत राहिले पाहिजे?

पीटरःखोकला हे क्रमांक एकचे लक्षण आहे.

७०. टीईडीएमईडीः संसर्गग्रस्त लोकांना ओळखण्यासाठी ताप हा चांगला मार्ग आहे का?

पीटरःउच्च ताप हा चिंतेचे कारण बनू शकतो आणि त्याकडे वैद्यकीय लक्ष पुरवले गेले पाहिजे. पण केवळ तापासाठी उदाहरणार्थ एखाद्या विमानतळावर किंवा तपासणीनाक्यावर स्क्रीनिंग केल्यास अनेक संसर्गग्रस्त लोकांना तसेच सोडून दिले जाते.

७१. टीईडीएमईडीः चीनी रूग्णालयांमध्ये आलेल्या किती टक्केवारीत लोकांमध्ये तापाशिवाय विषाणु आढळला?

पीटरः रूग्णालयांत ३० टक्के चीनी कोरोनाविषाणुचे रूग्ण आले तेव्हा त्यांना ताप नव्हता.

७२. टीईडीएमईडीः नवीन विषाणु एखाद्या देशात जेव्हा शिखरावर जातो आणि नवीन रूग्ण सापडण्याचे बंद होते तेव्हा परतण्याची शक्यता कितपत असते?

पीटरःदेवी आणि जवळपास पोलिओला आपण जसे हद्दपार केले तसे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला सार्स-सीओव्ही२ सोडण्याची शक्यता नाही.

७३. टीईडीएमईडीः म्हणजे, नवीन कोरोना विषाणुला हरवायचे असेल तर दिर्घकालीन लोकसंख्यानिहाय लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे?

पीटरःआपल्याला खरोखरच माहित नाही. लोकसंख्येवर आधारित उपाय कदाचित काम करतील, पण लस अत्यंत आवश्यक आहे आणिशक्यता आहे की विषाणु जोपर्यंत स्थिर आहे आणि स्वतःमध्ये बदल घडवत नाही तोपर्यंत व्यवहार्य आहे.

७४. टीईडीएमईडीः कदाचित नवीन विषाणु इतर अनेक विषाणुंप्रमाणे जळाला असल्याची शक्यता आहे?

पीटरःआपल्याला माहित नाही, पण तसे घडले असल्याची शक्यता नाही. सार्स-सीओव्ही२ जगभरात अगोदरच चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाला आहे. हा केवळ एकट्या चीनचा मुद्दा नाही;हजारो लोक त्यामुळे संसर्गग्रस्त झाले आहेत पण अजून त्यांची परिक्षा केली गेलेली नाही-केवळ चीनमध्येच नव्हे तर जवळपास १०० इतर देशांमध्ये असेच आहे. सार्स-सीओव्ही२, इन्फ्ल्युएंझाच्या विषाणुप्रमाणे हंगामी तापाला कारण ठरतो, आपल्याबरोबर तो खूप,खूप काळ राहिल.

७५. टीईडीएमईडीः हा नवा विषाणु लाटा की चक्रामध्ये परत येईल आणि आला तर केव्हा?

पीटरःपुन्हा, आपल्याला माहित नाही. पण हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित, या सुरूवातीच्या अवस्थेत, कशाचीच खात्री देता येत नाही. १९१८ च्या महामारी फ्ल्यूने जगाला ३ लाटांमध्ये वेढले होते. चीनमध्ये शाळा आणि कारखाने उघडल्यानंतर नवीन विषाणु दुसर्या लाटेत येईलही. परंतु प्रत्यक्षात काय घडते ते पाहिल्याशिवाय, आपल्याला सार्स-सीओव्ही२ कसे वर्तन करेल, याची आम्हाला माहिती नाही.

७६.टीईडीएमईडीः जर आम्हाला एखादे नशिबाने एखाद दुसरे यश आगामी महिन्यात मिळाले, तर ते कसे नशिबवान असेल?

पीटरः उष्ण हवामान त्याचा प्रसार रोखेल, पण असेच होणार का याबाबत आमच्याकडे काहीही पुरावा नाही. सिंगापूरमध्ये, अगोदरच १२० रूग्ण असून जगातील सर्वोत्कृष्ट कोविड-१९ कार्यक्रम त्यांच्याकडे आहे, जो विषुववृत्तापासून अवघ्या ७० मैलावर आहे-त्यामुळे किमान सिंगापूरच्या बाबतीत तरी, उष्ण हवामान विषाणुचा प्रसार रोखू शकलेले नाही. सार्स-सीओव्ही२ कमी घातक स्वरूपात स्थिरपणे स्वतःमध्ये बदल घडवेल, ज्यामुळे कमी मनुष्यहानी होईल, हे शक्य आहे, जे २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूच्या बाबतीत झाले आहे. पण मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. परिणामकारक औषधोपचार पद्धती किंवा औषधांचे मिश्रण सापडल्याची बातमी अत्युत्कृष्ट असेल. पण ते नशिबावर अवलंबून आहे.

७७. टीईडीएमईडीः ज्या लोकांना कोविड-१९ चा उच्च धोका आहे त्यांच्या मरण्याची शक्यता सर्वत्र सारखीच आहे का?

पीटरःदुर्दैवाने, तुमची मरण्याचा धोका तुम्ही जगाच्या कोणत्या भागात रहाता यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला गरज असेल तुम्हाला अत्यंत चांगल्या सुसज्ज आधुनिक रूग्णालयात शुश्रुषा मिळत असेल, जे अनेक लोकांना उपलब्ध आहे, अशी आम्ही आशा करतो, मृत्युचा दर अतिदक्षता श्वसनयंत्र असल्याने आणि दुय्यम संसर्ग थोडे होत असल्याने फार कमी असेल.

७८. टीईडीएमईडीः मी सौम्य समूहात आहे की मला रूग्णालयात दाखल करायची गरज आहे, हे मी कसे ओळखू शकतो?

पीटरःमला खात्रीपूर्वक माहित नाही, पण ७० वयाच्या वर असून जुनाट आजार असेल तर तुमच्या तीव्र आजाराची शक्यता वाढते आणि मृत्युही येऊ शकतो. आम्ही केवळ शक्यतांच्या बाबतीत बोलतो, कारण आम्हाला अजून कोविड-१९ च्या बाबतीत पुरेशी माहिती नाही.

७९. टीईडीएमईडीः कोविड-१९ होणार असल्याबाबत मी काळजी करावी का? पीटर, तुम्हाला कितपत चिंता वाटते?

पीटरः जर तुम्ही उच्च जोखिम नसलेले असाल, तर मी फारशी काळजी करणार नाही, पण संसर्गग्रस्त होण्यापासून टाळण्यासाठी मी जे जे शक्य ते प्रत्येक करेन कारण वैयक्तिक परिणामांबाबत काहीच सांगता येत नाही. हा संसर्ग अधिग्रहित करण्याचा धोका प्रत्येकाला अखेरीस येत्या काही वर्षांत आहेच, अगदी ज्याप्रमाणे कुणीही सामान्य सर्दी किंवा फ्ल्यू टाळू शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी पहिल्या लक्षणांबरोबरच घरी थांबण्यास तयार असले पाहिजे.

८०. टीईडीएमईडीः प्रत्येकाला हा विषाणु संसर्ग होण्याचा धोका आहे, या तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय?

पीटरःमाझ्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्व मानव इतर मानवांबरोबर वेळ घालवतातच, त्यामुळे आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहोत आणि जीवशास्त्र अदम्य आहे. तरीसुद्धा, मी समंजसपणे दक्षता घेईन आणि त्याचवेळी, फार चिंतेने पछाडला जाणार नाही. ते उपयुक्त होणार नाही.

८१. टीईडीएमईडीः जर प्रत्येकाला नव्या विषाणुचा संसर्ग होणारच आहे, तर मग तो टाळण्यासाठी प्रयत्न तरी का करायचा?

पीटरः जर मला विषाणुचा संसर्ग अगदी ताबडतोब झाला तर मी त्यावर उपाय करून पुढे जाईन. आम्हाला त्याच्या प्रसाराची गति कमी करायची आहे, ज्याचा अर्थ नव्या रूग्णांचा आणि एकूणच रूग्णांचा आकडा कमी करायचा आहे, ज्यामुळे आमची रूग्णालये सर्वात ग्रस्त रूग्णांना ओझ्याखाली दबून न जाता किंवा ज्या रूग्णांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशांना इतरत्र न पिटाळता हाताळू शकतील.

८२. टीईडीएमईडीः असे दिसते की लोक नव्या विषाणुच्या संसर्गातून बरे झाल्यावरही, अजूनही संक्रामक असतात. हे खरे आहे का?

पीटरः आम्हाला माहित नाही, पण असे दिसते की बरे झाल्यावर तसे होऊ शकते. आम्हाला संपूर्ण खात्री नाही. अधिक संशोधनाची गरज आहे.

८३. टीईडीएमईडीः एकदा तुम्हाला विषाणुचा संसर्ग झाला की तुम्ही त्याचा संसर्ग पुन्हा होण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी निर्भय होता का,जसे गोवर किंवा गालगुंडाच्या बाबतीत होते?

पीटरः येथेही पुन्हा, आम्हाला या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही.

८४. टीईडीएमईडीः स्वाभाविकच, एकदा या दुखण्याच्या पाळीतून बाहेर आलेल्या व्यक्तिला कोविड-१९ पासून कायमस्वरूपी रोगप्रतिकारकता मह्त्वाची आहे. अशी रोगप्रतिकारकता समाज म्हणूनही महत्वाची आहे का? का?

पीटरः लस विकसित करण्याच्या दृष्टिने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कारण संरक्षक प्रतिकारकतेने स्थिर विषाणुला प्रतिसाद देण्याच्या आमच्या क्षमतेवर लस अवलंबून असतात. आणि स्वाभाविकपणेच कालांतराने संसर्गग्रस्त होण्यास संवेदनाक्षम व्यक्तिंची संख्या हळूहळू कमी होत जाईल.

८५. टीईडीएमईडीः नवा विषाणु फ्ल्यूप्रमाणे हंगामी आहे का?

पीटरः सार्स-सीओव्ही२मध्ये हंगामी बदल होतात का, किंवा लाखो लोकांमधून जाताना ट्रिलियन्स नवीन विषाणु बदलतात का, हे पहाण्याइतके पुढे आम्ही अजून गेलेलो नाही.

८६. टीईडीएमईडीः म्हणजे हा विषाणु नव्या लक्षणांसह नवीन आविष्कारात बदल घडवतो?

पीटरःआम्हाला त्याची अजिबात माहिती नाही. जर तसे तो करत असेल तर, सार्स-सीओव्ही२ च्या बदललेल्या आवृत्तीचा प्रसार रोखण्यासाठी आम्हाला नव्या लसीची आवश्यकता भासू शकते.

८७. टीईडीएमईडीः जर विषाणुत नैसर्गिकरित्या बदल होत असेल तर, त्याचा अर्थ असा आहे का की तो अधिक घातक होईल आणि दुसरीकडे, तो कदाचित कमी घातक होईल?

पीटरःहो. कोणती तरी एक शक्यता आहे. पण नवा विषाणु असल्यामुळे, आम्हाला त्यातील बदल काय करतात, याची माहिती नाही.

८८. टीईडीएमईडीः कोरोना विषाणु जाणार नाही, असा धोका असेल तर माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी त्याचा काय अर्थ आहे?

पीटरःत्याचा अर्थ असा की आम्हा सर्वाना त्याचा मुकाबला करायला शिकले पाहिजे आणि आम्ही सुरक्षित वर्तन करू, याची खात्री केली पाहिजे. कुटुंबातील वृद्ध लोकांच्या गरजांबाबत आम्हाला विशेषत्वाने जाणीव असली पाहिजे.

८९. टीईडीएमईडीः मी असे ऐकले आहे की विषाणु सपाट पृष्ठभागावर ९ दिवस जिवंत राहतो. हे खरे आहे का?

पीटरःसार्स-सीओव्ही२ काही पृष्ठभागांवर राहू शकतो हे शक्य आहे, पण किती काळ हे आम्हाला माहित नाही.

९०. टीईडीएमईडीः आधुनिक काळातील सर्वात भयंकर महामारी जागतिक महायुद्धाच्या अखेरीस १९१८ ची फ्ल्यूची होती.त्या महामारीत, इन्फ्ल्युएन्झाने स्वतःत बदल घडवला-तो नवीन विषाणु नव्हता. सार्स-सीओव्ही२ त्या बदलाशी तुलना करता कसा आहे?

पीटरः सार्स-सीओव्ही२ १९१८ च्या इन्फ्ल्युएन्झा महामारीसारखाच संक्रामक आहे आणि जवळपास त्याच्याइतकाच भयंकर असल्याचे दिसते, पण काळच सांगेल. लक्षात घ्या, १९१८ मध्ये आज विकसित जगात आहे तशी काहीही वैद्यकीय प्रणाली नव्हती आणि बॅक्टेरियापासून होणार्या न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकेही नव्हती, जे मृत्युचे प्रमुख कारण होते.

९१. टीईडीएमईडीः हा मोठ्या प्रमाणात एक विशाल असा चुकीचा धोक्याचा इषारा आहे का आणि या उन्हाळ्यात आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा सर्वजण आपण काहीच नसताना विनाकारण घाबरलो, असे तर म्हणणार नाही?

पीटरः नाही.कोविड-१९ हा अगोदरच १०० देशांमध्ये आहे आणि तो अत्यंत संक्रामक आहे. वस्तुतः दररोज अनेक देशांमध्ये नवनवीन रूग्ण सापडत आहेत. ही काही ड्रिल नाही.ही वस्तुस्थिती आहे.

९२. टीईडीएमईडीः अचानक एक खर्या अर्थाने नवीन विषाणु जो मानवजातीने कधीही पाहिला नाही असा लाखो लोकांना संसर्ग करतो, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. शेवटचे असे कधी घडले होते?

पीटरः सार्स आणि मेर्स हे नवीन होते, पण ते तितक्या प्रमाणात वाढले नाहीत. एचआयव्ही जगासाठी नवीन होता आणि

त्याने ७० दशलक्ष लोकांना संसर्गग्रस्त केले-ज्यापैकी ३ कोटी २० लाख लोक एचआयव्ही महामारीने मरण पावले.

९३. टीईडीएमईडीः एचआयव्हीने गरिब देशांना श्रीमंत देशांपेक्षा जास्त प्रमाणात संसर्गित केले. नव्या विषाणुसाठी हे खरे आहे का?

पीटरःहो. अगदी संपूर्णपणे असेच आहे. अमेरिकेसारखे श्रीमंत देश अधिक चांगले हायड्रेशन, पूरक श्वसनाची उपकरणे, संसर्गाची योग्य हाताळणी आणि तत्सम गोष्टींमुळे खूप कमी मृत्युदर राखणार आहेत. कमी साधनसंपत्ती असलेल्या आणि सुमार दर्जाच्या आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये हा संभवतः अत्यंत गंभीर प्रश्न असेल. आफ्रिकेतील अनेक देश प्रचंड धोक्याला सामोरे जातील. जगातील सर्वाधिक साधनसंपत्तीचे आव्हान असलेल्या देशांमध्ये तो पोहचेल, तेव्हा तो विनाश घडवून आणेल.

९४. टीईडीएमईडीः असे वाटते की तुम्ही खूप जास्त आशावादी नाही, असा अंतर्प्रवाह आहे.

पीटरःसाधारणपणे, मी निश्चितच आशावादी आहे पण त्याचवेळी, खूप काही असे आहे की जे अस्वस्थ आणि निराश करणारे आहे. मला समजते की लोकांना भीती वाटते, विशेषतःजेव्हा ते एका किंवा जास्तीच्या उच्च जोखिम असलेल्या गटांमध्ये असतात. पण एक चांगली बातमीही आहे, विशेषतः विज्ञान आणि औषधीशास्त्रात जागतिक सहकार्यात आम्ही प्रगती झालेली पहात आहोत. सरकारांमध्ये अधिक पारदर्षकता पहातो आहोत. चीनमध्ये नव्या रूग्णांची संख्या झपाट्याने उतरते आहे,पण त्यात बदल होऊ शकतो. आणि आम्ही पहात आहोत की उपचारपद्धतीत अगदी झपाट्याने विकास होत आहे.

९५. टीईडीएमईडीः तुम्ही असे म्हणालात की खूप काही चिंता करण्यासारखे आहे. नव्या विषाणुसंदर्भात तुमची सर्वात मोठी चिंता कोणती आहे?

पीटरःसुमार दर्जाचे व्यवस्थापन केल्यास, कोरोना विषाणुचा प्रसार एखाद्या देशाच्या आरोग्यसेवा प्रणालीवर झटक्यात बोजा बनू शकतो आणि ज्यांना खरोखरच वैद्यकीय पोहच आवश्यक आहे, त्यांना त्यापासून वंचित केले जाईल. दुसरी चिंता ही आहे की अतिरिक्त प्रतिक्रिया आणि भीतीमुळे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ढासळू शकते, ज्यामुळे इतर प्रकारचे नुकसान होते. म्हणून, हा अत्यंत अवघड असा पेच आहे.

९६. टीईडीएमईडीः मानसिकदृष्ट्या कसे तयार असायला हवे?

पीटरःअमेरिकेत प्रत्येक शहरात जेथे परिक्षा करणे सुरू होईल तेथे अनेक नवीन रूग्ण सापडल्याच्या तसेच मृतांचा आकडा विशेषतः वृद्धांच्या मृत्यु झाल्याच्या बातम्या ऐकण्याची तयारी आम्ही केली पाहिजे. वास्तवात ते काही नेहमीच नवीन रूग्ण नाहीत; ते अस्तित्वात असलेलेच आहेत पण प्रथमच दृष्यमान झाले आहेत.

९७. टीईडीएमईडीःकोणत्या गोष्टी तुम्हाला उत्साहित करतात?

पीटरःआधुनिक जीवशास्त्र सुसाट वेगाने धावते आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह, जगभरातील सार्वजनिक आरोग्य समुदायाव्यतिरिक्त, सरकारी नेतेही आता सर्वोच्च स्तरावर या धोक्यावर फोकस करत आहेत.आम्ही विषाणुला काही दिवसांत विलग केले असून त्वरित अनुक्रमितही केले. लवकरच आमच्याकडे उपचारपद्धती असेल,याबाबत मला विश्वास आहे. आम्ही लवकरच लस मिळवू, याबद्दल आम्हाला आशा आहे. हे खर्या अर्थाने आधुनिक संपर्काचे जग आहे. त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो. जोपर्यंत आम्ही बनावट आणि धोकादायक बातम्यांना कचर्यात टाकू शकू.

९८. टीईडीएमईडीःयासाठी अमेरिका कितपत तयार आहे?

पीटरःअमेरिकेकडे आणि इतर उच्च उत्पन्न असलेल्या देशांकडे या महामारीसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. चीनच्या अभूतपूर्व सामूहिक विलगीकरणामुळे आम्हा सर्वांना फायदा झाला आहे कारण त्यामुळे त्याचा प्रसार संथगतिने होत आहे. अमेरिका सुरूवातीपासूनच गंभीर प्रकरणे अधिक तयारी करून अचूकरित्या हाताळू शकते.

९९. टीईडीएमईडीः तुम्हाला सर्वात जास्त चिंता कशाची वाटते?

पीटरः कमी साधनसंपत्ती असलेल्या देशांची मला जास्त चिंता वाटते. प्रत्येक मृत्यु हा शोकांतिका आहे. आम्ही जेव्हा असे म्हणतो की, सरासरी १ ते २ टक्के संसर्गित लोक कोरोना विषाणुमुळे मृत्युमुखी पडतात, तेव्हा ते खूप जास्त संख्या आहे. शेवटी, १० लाख लोकांपैकी १ टक्के म्हणजे १० हजार लोक होतात आणि मला जास्त चिंता आहे ती वृद्धांची. ९८ ते ९९ टक्के लोक यातून मरणार नाहीत. हंगामी फ्ल्यूने दरवर्षी हजारो अमेरिकन्स मरतात आणि तरीही तुम्हाला घबराट होत नाही. आम्ही फ्ल्यूला खूप गांभिर्याने घ्यायला हवे आणि प्रत्येकाने दरवर्षी त्याची लस टोचून घ्यायला हवी. हंगामी फ्ल्यूसोबत आम्ही रहायला शिकलो आहोत, तसेच कोविड-१९ चे अस्तित्व असतानाही, जोपर्यंत प्रभावी लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला आता सामान्य पद्धतीने जगणे शिकण्याची गरज आहे.

१०० टीईडीएमईडीः भविष्यात आणखी काही महामारी असतील का?

पीटरः निश्चितच हो. आमच्या मानवी अवस्थेचा आणि विषाणु असलेल्या ग्रहावर जगण्याच्या पद्धतीचा हा भाग आहे. ही कधीही न संपणारी लढाई आहे. आम्हाला आमची तयारी सुधारायला हवी. त्याचा अर्थ महामारीच्या विरोधातील तयारीत गंभीरपणे गुंतवणूक केली पाहिजे आणि पुढील वेळेस घर पेटण्याच्या आत जागतिक अग्निशमन यंत्रणा उभारली पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.