ETV Bharat / bharat

काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; तीन दिवसांमधील तिसरी घटना - काश्मीर दहशतवादी हल्ला

काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात, दोन सफरचंद व्यापाऱ्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे, याआधीही एका सफरचंद वाहून नेणाऱ्या ट्रकवर हल्ला करून दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता.

apple trader killed in terrorist attack
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:55 PM IST

श्रीनगर : काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात, दोन सफरचंद व्यापाऱ्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही व्यापारी मूळचे पंजाबचे होते.

चरणजीत सिंग आणि संजीव अशी या दोन व्यापाऱ्यांची नावे आहेत. आज संध्याकाळी ७.३०च्या दरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ पुलवामाच्या जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान चरणजीत सिंग याचा मृत्यू झाला आहे, तर संजीवची प्रकृती नाजुक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.गेल्या तीन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे, याआधीही एका सफरचंद वाहून नेणाऱ्या ट्रकवर हल्ला करून दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता. यामध्ये मूळचा राजस्थानचा असलेला ट्रकचालक जागीच ठार झाला होता.

हेही वाचा : जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक

Intro:Body:

काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; तीन दिवसांमधील तिसरी घटना

काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात, दोन सफरचंद व्यापाऱ्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे, याआधीही एका सफरचंद वाहून नेणाऱ्या ट्रकवर हल्ला करून दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता.

श्रीनगर : काश्मिरच्या शोपियन जिल्ह्यात, दोन सफरचंद व्यापाऱ्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही व्यापारी मूळचे पंजाबचे होते.

चरणजीत सिंग आणि संजीव अशी या दोन व्यापाऱ्यांची नावे आहेत. आज संध्याकाळी ७.३०च्या दरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ पुलवामाच्या जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान चरणजीत सिंग याचा मृत्यू झाला आहे, तर संजीवची प्रकृती नाजुक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या तीन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे, याआधीही एका सफरचंद वाहून नेणाऱ्या ट्रकवर हल्ला करून दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता. यामध्ये मूळचा राजस्थानचा असलेला ट्रकचालक जागीच ठार झाला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.