ETV Bharat / bharat

थोडक्यात बचावलो..., आंबेगाव दुर्घटनेतून वाचलेल्या कामगारांच्या प्रतिक्रिया

घटनेत थोडक्यात बचावलेला पटेल म्हणाला, मला काहीही दिसले नाही. मी स्वत: मृत झालेल्या व्यक्तींसोबत ढिगाऱ्याखाली दबलो होतो. माझा फक्त चेहरा उघडा होता.

author img

By

Published : Jul 2, 2019, 7:52 AM IST

दुर्घटना

पुणे - मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे दुर्घटना प्रतिक्रिया

घटनेत थोडक्यात बचावलेला पटेल म्हणाला, मला काहीही दिसले नाही. मी स्वत: मृत झालेल्या व्यक्तींसोबत ढिगाऱ्याखाली दबलो होतो. माझा फक्त चेहरा उघडा होता. माझ्या अंगावर पत्रा पडला होता आणि त्यावर विटांचा ढिगारा पडला होता. मी जोरजोराने ओरडत होतो. यानंतर काहीजण तेथे आली आणि त्यांनी मला वाचवले. मी आई-वडीलांसोबत राहतो. परंतु, माझे आई-वडील गावी गेल्यामुळे मी मित्राकडे झोपायला गेलो होतो. मित्राचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत बोलताना मजूर म्हणून काम करत असलेला दीपक ठाकरे म्हणाला, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला. बाहेर येऊन बघितले तर, मजुरांच्या झोपड्यांवर भिंत कोसळली होती. यामध्ये मजूर दबले होते. दबलेल्यांपैकी एक तरुण मोठ्याने आवाज करत होता. त्यानंतर, मी सर्वांना आवाज दिला. त्यानंतर, सुरक्षारक्षकाने बिल्डराला फोन करत याची माहिती दिली. यानंतर, बचावकार्य सुरू झाले. झोपडीत १५ ते १६ लोक राहत होते. यापैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये माझ्या मावशीच्या २ मुलांचा समावेश होता. बाकी मृत छत्तीसगढ येथील राहिवासी आहेत.

Intro:आंबेगाव खुर्द येथील दुर्घटनेतुन थोडक्यात बचावलेल्या तरुणांच्या प्रतिक्रियाBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.