ETV Bharat / bharat

‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट’ - congress

'हे सर्व पूर्वनियोजित होते. मोदींना वाटत असेल की, ४२ जवानांची हत्या करून त्यांच्या चितांच्या राखेने त्यांना लोकसभा निवडणूकीत राजतिलक लावता येईल, तर जनता असे होऊ देणार नाही,' असे वक्तव्य करत कुरेशी यांनी मोदींवर गंभीर आरोप केला आहे.

माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी
author img

By

Published : Apr 15, 2019, 10:55 AM IST

नवी दिल्ली - माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. कुरेशी यांनी पुलवामा आत्मघातकी हल्ला हा मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता, असा धक्कादायक आरोप केला आहे. अजीज कुरेशी हे उत्तराखंड आणि मिझोरमचे माजी राज्यपाल आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • #WATCH MP: Ex-Mizoram Guv Aziz Qureshi speaks on Pulwama attack&PM, says "Plan karke aapne ye karwaya taki apko mauka mile, lekin janta samajhti hai. Agar Modi ji chahein ki 42 jawanon ki hatya karke, unki chitaon ki raakh se apna rajtilak kar lein, janta nahi karne degi."(14.04) pic.twitter.com/WvQfFpKF8L

    — ANI (@ANI) April 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'हे सर्व पूर्वनियोजित होते. त्यामुळे तुम्हाला लोकसभा निवडणूक जिंकणे शक्य होईल. मात्र, जनतेला सर्व समजते. मोदींना वाटत असेल की, ४२ जवानांची हत्या करून त्यांच्या चितांच्या राखेने त्यांना राजतिलक लावता येईल, तर जनता असे होऊ देणार नाही,' असे वक्तव्य करत कुरेशी यांनी मोदींवर गंभीर आरोप केला आहे. ‘स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळालाच कसा ?’ असा प्रश्न कुरेशी यांनी उपस्थित केला.
माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी
याआधी काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची वादग्रस्त वक्तव्ये केली होती. हरिप्रसाद यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला होता. तसेच, मोदींनी मतांसाठी सीआरपीएफ जवानांचा बळी दिल्याचा आरोप केला होता.कुरेशी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने अद्याप उमेदवार जाहीर न केल्याबद्दल टोला लगावला. भाजपला दिग्विजय सिंह यांच्याविरोधात पराभव होण्याची भीती वाटत असून यामुळेच त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात उशीर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी भाजप नेत्यांना मध्य प्रदेशातील लोकांकडे मत मागण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

pulwama terror attack was planned conspiracy by pm narendra modi to win lok sabha polls alleges former governor congress aziz qureshi

pulwama terror attack, planned conspiracy, pm narendra modi, win lok sabha polls, allegation, former governor aziz qureshi, congress, bjp

----------------

‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट’

नवी दिल्ली - माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. कुरेशी यांनी पुलवामा आत्मघातकी हल्ला हा मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता, असा धक्कादायक आरोप केला आहे. अजीज कुरेशी हे उत्तराखंड आणि मिझोरमचे माजी राज्यपाल आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

'हे सर्व पूर्वनियोजित होते. त्यामुळे तुम्हाला लोकसभा निवडणूक जिंकणे शक्य होईल. मात्र, जनतेला सर्व समजते. मोदींना वाटत असेल की, ४२ जवानांची हत्या करून त्यांच्या चितांच्या राखेने त्यांना राजतिलक लावता येईल, तर जनता असे होऊ देणार नाही,' असे वक्तव्य करत कुरेशी यांनी मोदींवर गंभीर आरोप केला आहे. ‘स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळालाच कसा ?’ असा प्रश्न कुरेशी यांनी उपस्थित केला.

याआधी काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची वादग्रस्त वक्तव्ये केली होती. हरिप्रसाद यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला होता. तसेच, मोदींनी मतांसाठी सीआरपीएफ जवानांचा बळी दिल्याचा आरोप केला होता.

कुरेशी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने अद्याप उमेदवार जाहीर न केल्याबद्दल टोला लगावला. भाजपला दिग्विजय सिंह यांच्याविरोधात पराभव होण्याची भीती वाटत असून यामुळेच त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात उशीर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी भाजप नेत्यांना मध्य प्रदेशातील लोकांकडे मत मागण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.