चेन्नई - पीएसएलव्ही सी-४८ या यानाची मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. 'रिसॅट २ बीआर १' या रडार इमेजिंग अर्थ ऑबजर्वेशन उपग्रहासह नऊ विदेशी उपग्रह त्यांच्या कक्षेत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, श्रीहरीकोटावरून झालेली ही ७५ वी, तर पीएसएलव्ही यानाची ही ५० वी मोहीम होती.
-
Indian Space Research Organisation (ISRO): All 9 customer satellites (from Israel, Italy, Japan and USA) successfully placed in their designated orbit by PSLV C48. https://t.co/3M9v0D306P
— ANI (@ANI) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Indian Space Research Organisation (ISRO): All 9 customer satellites (from Israel, Italy, Japan and USA) successfully placed in their designated orbit by PSLV C48. https://t.co/3M9v0D306P
— ANI (@ANI) December 11, 2019Indian Space Research Organisation (ISRO): All 9 customer satellites (from Israel, Italy, Japan and USA) successfully placed in their designated orbit by PSLV C48. https://t.co/3M9v0D306P
— ANI (@ANI) December 11, 2019
पीएसएलव्ही सी-४८ या यानाद्वारे भारताचा 'रिसॅट-२ बीआर-१' हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला. ६२८ किलो वजनाच्या या उपग्रहामुळे शेती, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये काम करण्यास मदत होईल. तसेच, लष्करी कामगिरीसाठीही या उपग्रहाचा मोठा फायदा होऊ शकेल, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली आहे.
यासोबतच अमेरिकेचे सहा आणि इटली, जपान आणि इस्त्राईलचे प्रत्येकी एक असे नऊ विदेशी उपग्रहदेखील प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हे सर्व उपग्रह त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले आहेत.
हेही वाचा : मर्यादा विश्वापलीकडल्या... इस्रोची अंतराळातील व्यावसायिक क्षेत्रात उडी!