श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने 28 व्यक्तींविरोधातील नागरिक सुरक्षा कायद्याखालील कारवाई रद्द केली आहे. यांच्यामध्ये काश्मीर खोऱ्यातील काही व्यावसायिकांचाही समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काश्मीरच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले, की यातील 22 जण उत्तर प्रदेशातली तुरुंगात बंद आहेत. तर सहा जण काश्मीरमधील तुरुंगामध्ये बंद आहेत. खोऱ्यातील प्रमुख व्यापारी आणि काश्मीर आर्थिक महासंघाचे प्रमुख मोहम्मद यासीन खान यांच्याविरोधीतीलही पीएसएचे कलमे रद्द करण्यात आली आहेत.
पिपल्स कॉन्फरन्सचे चेअरमन सज्जाद गनी यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधातील पीएसएही रद्द करण्यात आला आहे. कलम 370 रद्द करण्यात आल्यावर त्यांच्यावर सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई करण्यात आली होती.