ETV Bharat / bharat

गोली मारो गद्दारोंको... 'वाचाळवीरांच्या वक्तव्यानेच कदाचीत आमचा पराभव' - amit shah on delhi polls

'दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्हाला मान्य आहे. मात्र, देश के गद्दारों को, गोली मारो *** को, अशी वक्तव्ये टाळायली पाहिजे होती. - शाह

अमित शाह
अमित शाह
author img

By

Published : Feb 13, 2020, 8:05 PM IST

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षासमोर भाजपचा निभाव लागला नाही. तब्बल २०० पेक्षा जास्त नेत्यांची फौज दिल्लीमध्ये प्रचारासाठी उतरवण्यात आली होती. मात्र, तरीही भाजपचा पराभव झाला. दिल्लीतील पराभवावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडले आहे. भाजप नेत्यांनी केलेली वक्तव्ये पराभवाला कारणीभूत ठरली असावीत, अशी कबूली त्यांनी दिली आहे.

  • Union Home Minister Amit Shah at Times Now Summit: I accept our defeat in Delhi elections. Statements like 'Desh ke gadaron ko' should not have been made. The party might have suffered because of such statements. (file pic) pic.twitter.com/mMP7rIaVJs

    — ANI (@ANI) February 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्हाला मान्य आहे. मात्र, देश के गद्दारों को, गोली मारो *** को, अशी वक्तव्ये टाळायली पाहिजे होती. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कदाचित भाजपला तोटा झाला असावा, असे अमित शाह यांनी मान्य केले. ते दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

शाहीन बाग, नागरिकत्व सुधारणा कायदा, भारत- पाकिस्तान या मुद्द्यांवरून अनेक भाजपच्या नेत्यांनी वाचाळपणे वक्तव्ये केली. तर एकीकडे केजरीवाल फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलत राहिले. त्यामुळे पक्षाला तोटा झाल्याचे एक प्रकारे शाह यांनी मान्य केले आहे.

वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही शाह यांनी यावेळी वक्तव्य केले. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर कोणाला बोलायचे असेल तर मी ३ तीन दिवसांचा वेळ देतो. कोणीही माझ्याबरोबर येऊन चर्चा करू शकतो, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.