लातूर - पुलावामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. वीरमरण आलेल्या या जवानांना जळकोटमध्ये कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन सर्व समाजातील जातीधर्माचे शेकडो युवक, व्यापारी एकत्र येत रस्त्यावर उतरले होते. या रॅलीत सहभागी झालेल्या शेकडो युवकांनी 'पाकिस्तान मुर्दाबद...खून का बदला खून' अशी घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा जाळून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
या रॅलीत सहभागी झालेल्या संदेश अकॅडमीच्या महिला जवानांनी, एका शायरीद्वारे पाकिस्तानला उत्तर दिले. युवकांनी जशास तसे उत्तर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दोन दिवसांपासून तालुक्यातील गावागावात वीर जवानांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रत्येकजण मत व्यक्त करीत आहे.