नवी दिल्ली - शहरातील सराय रोहिल्ला परिसरात रेल्वे रुळावर एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला आहे. तर रानी बाग येथील त्यांच्या घरी आई मृतावस्थेत आढळून आली. मृत प्राध्यापकाचे नाव एलेन स्टेनले असून ते सेंट स्टीफन महाविद्यालयामध्ये शिकवतात. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
एलेन स्टेनले यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेप्रकरणी अद्याप सविस्तर वृत्त हाती आले नाही.