नवी दिल्ली - कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही उद्यापासून देशात १५ विशेष प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे विभागाची ऑनलाईन बुकिंग वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लीकेशन सुरू होण्यात अडचण येत होती. विशेष गाड्यांची माहीती वेबसाईटवर अपडेट होत असून थोड्याच वेळात सेवा सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून दिली होती. मात्र, आता बुकिंग सेवा सुरु झाली आहे. उद्यापासून प्रवासी गाड्या सुरु होणार आहेत.
विशेष गाड्यांतून प्रवास करण्यासाठी रेल्वे विभागाची नियमावली
- श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांबरोबर प्रवाशांसाठी रेल्वेने ही अतिरिक्त सेवा सुरु केली आहे.
- प्रवासावेळी मास्क घालणे बंधणकारक
- १st class AC , २nd class AC आणि ३rd class AC क्लासमधून प्रवास
- प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून फक्त ऑनलाईन तिकिट मिळणार आहे.
- फक्त सात दिवस आधी तिकीट आरक्षित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- प्रवाशांनी स्वत:चे पाणी आणि खाद्यपदार्थ घेऊन यावे.फक्त पाकिटबंद खाद्यपदार्थ मिळतील
- रेल्वे गाडी सुटण्याआधी प्रवाशांनी किमान ९० मिनिटे आधी स्टेशनवर पोहचावे. त्या काळात प्रवाशांची प्राथमिक तपासणी केली जाईल.
- रेल्वेमध्ये उश्या, चादरी, पडदे काहीही पुरविले जाणार नाहीत. प्रवाशांनी स्वत:चे पांघरून घेऊन यावे.
- तिकिट बुक झालेल्या प्रवाशांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे.
- आरोग्य सेतू अॅप प्रवाशांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक
- तिकिटात केटरींग चार्जेस असणार नाहीत.
-
Timings of Special Trains to be run w.e.f. 12.05.20 pic.twitter.com/mVzMCNwzBa
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Timings of Special Trains to be run w.e.f. 12.05.20 pic.twitter.com/mVzMCNwzBa
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 11, 2020Timings of Special Trains to be run w.e.f. 12.05.20 pic.twitter.com/mVzMCNwzBa
— Ministry of Railways (@RailMinIndia) May 11, 2020
-
वेबसाईटवर लॉगईन होत नसल्याने बुकिंग कोठून करणार हा प्रश्न आहे. फक्त ऑनलाईन तिकीटच मिळणार असून एक तास आधी स्टेशनवर हजर रहावे लागणार आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे सर्व नियम पाळूनच प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या 'विशेष गाड्या' नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून भारतातील विविध शहारांमध्ये जाणार आहेत. दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरूवअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल,अहमदाबाद आणि जम्मू तावी या रेल्वेस्थानकांवर जातील.
'११ मे'ला सायंकाळी चारनंतर या गाड्यांमध्ये आरक्षण करता येईल, असे रेल्वे विभागाने जाहीर केले होते. मात्र, वेबसाईट सुरु होण्यात अडचण येत आहे. केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरूनच या गाड्यांमध्ये आरक्षण करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुक करण्याची काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांचे तिकीट केवळ ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटही देण्यात येणार नसून, केवळ तिकीट असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवाशांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासापूर्वी सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाणार आहे. केवळ कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.
यानंतर, भविष्यात आणखी काही मार्गांवर आणखी विशेष गाड्या सोडण्याचाही रेल्वेचा मानस आहे. कोरोना केअर सेंटर्ससाठी २०,००० कोच राखून ठेवण्यात आल्यानंतर, तसेच स्थलांतरीत कामगारांसाठीच्या श्रमिक विशेष रेल्वेंसाठी दररोजच्या कमाल ३०० गाड्या लक्षात घेतल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या कोचेसची संख्या पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.