नवी दिल्ली - कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील विणकरांच्या दुर्दशेचा उल्लेख केला आहे. प्रियांका यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे कि नवीन वीज दरांमुळे विणकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विणकरांना वीजदरांसाठी यूपीए एरा योजनेतून वीज आकारणी करण्याची मागणी केली आहे.
विणकरांच्या अडचणी..
उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी आपल्या पत्रात विणकरांची परिस्थिती मांडली आहे. त्यांनी लिहले आहे कि, सध्या विणकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मी पाहिले आहे. जगप्रसिद्ध बनारसी सिल्क साडी बनवणाऱ्या विणकरांना आता आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी देखील झगडावे लागत आहे. कोरोना महामारी आणि सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणांमुळे त्यांच्या व्यवसायावर वाईट दिवस आले आहेत. या विणकरांच्या उत्कृष्ट कामामुळेच उत्तर प्रदेशचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे. तेव्हा सरकारने या काळात त्यांची मदत करावी. तसेच 2006 मध्ये यूपीए सरकारने विणकरांना अल्प दरात वीज पुरवण्यासाठी योजना तयार केली होती मात्र योजना बंद केल्यामुळे विणकरांवर अन्याय होत असल्याचेही प्रियांका यांनी म्हटले आहे. ज्यावेळी विणकरांनी वीज दराच्या मुद्द्यावरुन आंदोलन केले होते तेव्हा त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्याचे आश्वासन त्यांना मिळाले होते मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
हेही वाचा - बसपाच्या सात आमदारांची हकालपट्टी - मायावतींची माहिती
विणकरांच्या मागण्या..
अल्पदर आकारले जावे, थकित वीजबिलांच्या नावाखाली पिळवणूक बंद करावी आणि विणकरांची वीजजोडणी बंद होऊ नये या विणकारांच्या तीन मागण्या प्रियांका यांनी पत्रातून केल्या आहेत. सरकार विणकरांच्या या प्रश्नांना गंभीररित्या घेऊन त्यावर उपाययोजना करेल अशी आशा प्रियांका यांनी व्यक्त केली आहे.