नवी दिल्ली - आज देशभरात स्वातंत्र्य दिनाबरोबरच रक्षाबंधनचा सणही उत्सहात साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी वाड्रा यांनीही रक्षाबंधनानिमित्त जुन्या आठवणी उजाळा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला भाऊ राहुल गांधी यांच्यासोबतचे एक बालपणीचे छायाचित्र शेअर केले आहे.
![Priyanka Gandhi shared a childhood photo, saying ... 'Rahul is the best brother in the world'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4146188_rahul.jpeg)
'@ राहूल गांधी मला वाटते की गोष्टी तितक्याही बदललेल्या नाहीत, नाही का..? तु जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस!', असे टि्वट प्रियंका यांनी केले आहे. हे छायाचित्र दोघांच्याही बालपणीचे आहे.
![Priyanka Gandhi shared a childhood photo, saying ... 'Rahul is the best brother in the world'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4146188_pri.jpg)
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या निर्णयाचे प्रियंका गांधी यांनी समर्थन केले होते. असा निर्णय घ्यायला धाडस लागते, माझा या निर्णयाला पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.