नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्हाधिकारी आमच्यावर दबाव टाकत असल्याचा पीडित कुटुंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी प्रियांका गाधी यांनी आज टि्वट करत संबधित जिल्ह्याधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच यूपी सरकार झोपेतून जागे झाले असले. तर पीडित कुटुबांचे दु:ख त्यांनी ऐकावे, असे त्या म्हणाल्या. तथापि, शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गाधी यांनी हाथरस पीडित कुटुबांची भेट घेतली होती.
-
यूपी सरकार यदि जरा भी नींद से जागी है तो उसे परिवार की बात सुननी चाहिए।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2/2
">यूपी सरकार यदि जरा भी नींद से जागी है तो उसे परिवार की बात सुननी चाहिए।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 4, 2020
2/2यूपी सरकार यदि जरा भी नींद से जागी है तो उसे परिवार की बात सुननी चाहिए।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 4, 2020
2/2
हाथरसच्या पीडित कुटुंबाप्रती सर्वात वाईट वागणूक डीएमची होती. त्यांचे संरक्षण कोण करीत आहे? त्यांना उशीर न करता काढून टाकले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणात त्याच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर आता एसआयटी चौकशी का सुरू आहे. जर यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर त्यांनी कुटुंबाचे ऐकावे, असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेश चंद्र यांनी शनिवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि पीडित कुटंबीयांचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर आज परत एसआयटीने पीडित कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सीबीआयचे आदेश दिले आहे.
तथापि, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे एक तास दोघांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली. दोघांनी पीडित कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना दोघांनी व्यक्त केली. 'जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहू, कोणीही आम्हाला अडवू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.