ETV Bharat / bharat

'देशातील सर्वोत्कृष्ट कंपन्याना विकण्याचे काम करतयं भाजप', प्रियंका गांधींचा हल्लाबोल - एअर इंडिया आणि बीपीसीएल

एअर इंडिया आणि बीपीसीएल कंपन्याना विकण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी
author img

By

Published : Nov 20, 2019, 5:20 PM IST

नवी दिल्ली - एअर इंडिया आणि बीपीसीएल कंपन्याना विकण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट कंपन्याना खिळखिळ करून त्यांना विकण्याचे काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली.

Priyanka Gandhi hit out BJP selling organisations
प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

सार्वजनिक क्षेत्रातील संस्था ह्या देशाचा अभिमान आहेत. भाजपने देशाचा विकास करण्याचे वचन दिले होते. मात्र भाजप भारतामधील सर्वोत्कृष्ट कंपन्याना खिळखिळे करून त्यांना विकण्याचे काम करत आहे. हे अत्यंत दु:खद आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

सरकार मार्च 2020 पर्यंत कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएल विकणार आहे. या कंपन्यांच्या विक्रीमधून सरकारी तिजोरीमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपये जमा होतील, अशी आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी व्यक्त केली होती.

Intro:Body:

ि्

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.