ETV Bharat / bharat

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे गांधी घराणे सोडून इतर नेत्यांना द्यावे, प्रियांकाकडून राहुल यांच्या वक्तव्याला पाठिंबा - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

हर्ष शाह आणि प्रदिप चिब्बर यांनी लिहिलेले इंडिया टूमारो : कॉन्व्हर्साशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटीकल लिडर्स पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात जी मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

priyanka back rahul
priyanka back rahul
author img

By

Published : Aug 19, 2020, 3:13 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे गांधी घराणे सोडून पक्षातील इतर नेत्यांना देण्यात यावे, असे मत माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केले आहे. या त्यांच्या मताला काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. त्या म्हणाल्या, की मागील निवडणुकीनंतर राहुल यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले आहे की, यापुढे शक्यतो गांधी घराणे सोडून पक्षातील इतर नेत्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात यावे. या त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

हर्ष शाह आणि प्रदिप चिब्बर यांनी लिहिलेले इंडिया टूमारो : कॉन्व्हर्साशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटीकल लिडर्स पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा -

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा, मिलिंद देवरा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मंगळवारी दिलासा मिळाला आहे. येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना पेटिंग विक्रीच्या प्रियांका गांधी व देवरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्लीची सेवाभावी संस्था अखिल भारतीय शांती प्रतिष्ठानतर्फे वकील राजीव लोचन यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांसह राणा कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्यावर मनी लाँड्रिग, फसवणूक असे गुन्हे दाखल करावे, असे याचिकेत नमूद केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.