ETV Bharat / bharat

पायलट यांचा काँग्रेसला रामराम? प्रिया दत्त यांचे ट्विट..

author img

By

Published : Jul 14, 2020, 5:51 PM IST

काँग्रेस नेते सचिन पायलट यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यातच काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांच्या ट्विटमुळे पायलट यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

priya dutt tweets a goodbye to Sachin pilot and jyptiraditya
पायलट यांचा काँग्रेसला रामराम? प्रिया दत्त यांचे सूटक ट्विट..

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यातच काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांच्या ट्विटमुळे पायलट यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"आणखी एका मित्राने काँग्रेस सोडली. सचिन आणि ज्योतिरादित्य हे चांगले सहकारी आणि मित्र होते. दुर्दैवाने पक्षाने दोन तरुण, आणि क्षमताशील नेत्यांना गमावले आहे. मला नाही वाटत त्यांचे महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे, त्यांनी कठीण काळामध्ये पक्षासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती." अशा आशयाचे ट्विट प्रिया दत्त यांनी केले आहे.

  • Another friend leaves the party both sachin and jyotirajya were colleagues & good friends unfortunately our party has lost 2 stalwart young leaders with great potential. I don't believe being ambitious is wrong. They have worked hard through the most difficult times.

    — Priya Dutt (@PriyaDutt_INC) July 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या जाण्याने मध्यप्रदेशमधील काँग्रेसची सत्ताही गेली होती. आता सचिन पायलट यांच्या जाण्याचे वृत्त खरे ठरले, तर तो राजस्थान काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. काही महिन्यांमध्येच पक्षातील बंडखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे, काँग्रेसमधील नेतृत्वावर आणि घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

हेही वाचा : गांधी कुटुंबीय काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा मत्सर आणि अपमान करते...उमा भारतींची बोचरी टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.