ETV Bharat / bharat

जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहिलं..अन् सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली मदत - जवान

मी शहीद जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहत होते. त्यावेळी मला वाटले मी यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. माझ्या या सोन्याच्या बांगड्याचा मला काय उपयोग...? आणि मी त्या विकून टाकण्याचा निर्णय घेतला. आलेले पैस पंतप्रधान मदत निधीला जमा केले.

बरेली1
author img

By

Published : Feb 22, 2019, 11:02 AM IST

बरेली (उत्तर प्रदेश) - वडिलांनी दिलेली अमुल्य भेट म्हणून सोन्याच्या बांगड्या जीवापेक्षाही जपल्या. मात्र पुलवामा दहशतवादीहल्ल्यात शहीद झालेल्या वीरपत्नींचा आक्रोश पाहिला आणि त्या सोन्याच्या बांगड्या विकून 'त्यांनी' वीरपत्नींना मदत केली. ही कथा आहे किरण जगवाल या खासगी शाळेत प्राचार्या असलेल्या एका संवेदनशील महिलेची.

  • Kiran Jhagwal: When I saw the wives crying I thought what can I do for them, I sold my bangles&donated money to PM Relief Fund. The bangles were gifted by my father. People must come forward. We're a population of 130 Cr, if everyone donates even Re 1 each a lot can be collected. pic.twitter.com/uLDmqYN9Jr

    — ANI UP (@ANINewsUP) February 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मी शहीद जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहत होते. त्यावेळी मला वाटले मी यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, माझ्या या सोन्याच्या बांगड्याचा मला काय उपयोग... आणि मी त्या विकून टाकण्याचा निर्णय घेतला. आलेले पैसे पंतप्रधान मदत निधीला जमा केले. त्या बांगड्या माझ्या वडिलांनी मला भेट म्हणून दिल्या होत्या, असे किरण यांनी सांगितले.

किरण जगवाल यांनी आपल्याकडे असलेले बांगड्या आणि दागिने विकून मिळालेले १ लाख ३८ हजार ३८७ रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले. शहीदजवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे. प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या मदतीतूनही मोठा निधी उभारला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.

Intro:Body:

जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहिलं..अन् वाटलं या बांगड्यांचा काय उपयोग

बरेली (उत्तर प्रदेश) - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी देश-विदेशात अनेकांनी सढळ हातांनी मदत केली. उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या शाळेतील महिला प्राचार्यांनी स्व:ताच्या बांगड्या विकून जवानांच्या कुटुंबांना मदत केली.

किरण जगवाल असे त्यांचे नाव असून त्या एका खासगी शाळेत प्राचार्य म्हणून काम करतात. त्यांनी आपल्याकडे असलेले बांगड्या आणि दागिने विकून मिळालेले १ लाख ३८ हजार ३८७ रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले.  

मी हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहत होते. त्यावेळी मला वाटले मी यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, माझ्या या बांगड्याचा काय उपयोग... आणि मी त्या विकून टाकण्याचा निर्णय घेतला, आलेले पैस पंतप्रधान मदत निधीला देऊ केले. त्या बांगड्या माझ्या वडिलांनी मला भेट म्हणून दिल्या होत्या, असे किरण यांनी सांगितले.

हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे. प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या मदतीतूनही मोठा निधी उभारला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.