ETV Bharat / bharat

मन की बात: ई सिगरेटच्या धोक्यापासून लोक अनभिज्ञ, नशेपासून दूर राहण्याचे मोदींचे आवाहन - modi on e cigrate

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी नवरात्र उत्सवासह आगामी विविध उत्सवाच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. तसेच ई सिगरेटपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Sep 29, 2019, 12:47 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवार) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी नवरात्र उत्सवासह येणाऱ्या विविध उत्सवांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या. २ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी केले. याबरोबरच इ -सिगरेटचे धोके सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

  • PM Narendra Modi: There is very little awareness among people about e-cigarettes. They are completely unaware of its danger and for this reason sometimes e-cigarettes find their way into homes out of curiosity. https://t.co/xi7zWbN2Qf

    — ANI (@ANI) September 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींनी तंबाखू आणि नशेच्या पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तबांखू अनेक जीवघेण्या आजारांना निमंत्रण देते. तसेच त्यातील हानिकारक पदार्थांमुळे मेंदूचा विकास खुंटतो. तंबाखू शरिराला अपायकारक असल्याने त्यापासून दूर राहिले पाहिजे. नुकतेच ई सिगरेटवर( इलेक्ट्रीक सिगरेट) बंदी घालण्यात आली, कारण त्यामध्येही हानिकारक केमिकल असतात, याची लोकांनी माहिती नाही. त्यामुळे मोदींनी युवकांना ई सिगरेटपासून लांब राहण्याचे आवाहन केले.

ई- सिगरेटने शरिराला कोणताही अपाय होत नाही हा चुकीचा समज लोकांमध्ये पसरला आहे. ई - सिगरेटमध्ये निकोटीनसारखे केमिकल गरम करण्याने वेगळाच धूर तयार होतो, तो शरीरासाठी धोकादायक असल्याचे मोदी म्हणाले.

व्हॅटीकन सिटी येथील पोप प्रान्सिस १३ ऑक्टोबरला सिस्टर मरियम थेरेसा यांना मरणोत्तर संत पदवी बहाल करण्यात येणार आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असल्याचेही मोदी म्हणाले. मरियम थेरेसा यांना मोदींनी आदरांजली वाहिली.

विविध उत्सवांच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना विविध सण आणि उत्सवांच्या शुभेच्छा दिल्या. आपण सर्व जण नवरात्री, गरबा, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, छट पूजा हे सण साजरे करणार आहोत, त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा असे मोदी म्हणाले. लता मंगेशकर यांनाही वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

मोदींनी २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्लॉस्टिक मुक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले. गांधीजींच्या १५० व्या जयंतीला स्वच्छतेचा संकल्प करून प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प सर्वजण करु, असे आवाहन मोदींनी केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.