ETV Bharat / bharat

'हाउडी मोदी' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानावर घणाघात

भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० ला हटवले. त्याचा झटका अशांना बसला जे स्वताचा देशही साभाळू शकत नाही, अशी अप्रत्यक्ष टिका मोदी यांनी पाकिस्तानवर केली आहे. अमेरिकेच्या हौस्टन येथील एनआरजी मैदानात मोदींचे संबोधन होते. त्या दरम्यान मोदी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

डोनाल्ड ट्रंप यांच्याबोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Sep 23, 2019, 10:40 AM IST

हौस्टन (यू.एस)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० ला हटवले. त्याचा झटका अशांना बसला जे स्व:ताचा देशही साभाळू शकत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका मोदी यांनी पाकिस्तानवर केली आहे.

'हौडी मोदी' कार्यक्रमात मोदी यांचा पाकिस्तानावर घणाघात

अमेरिकेच्या हौस्टन येथील एनआरजी मैदानात मोदींची सभा होती. त्या दरम्यान मोदी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. यावेळी मोदी यांनी मैदानात उपस्थित असलेल्या ५०,००० अमेरिकी-भारतीय नागरिकांना उभे राहून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचे स्वागत करण्याचे सांगितले. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलम ३७० मुळे काश्मीर येथे आतंकवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन मिळत होते. या कलमाला हटविल्यानंतर आता काश्मीरचा विकास होईल. आणि त्या राज्यातील महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर होणारा अत्याचार दूर होईल, असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर, कलम ३७० ला रद्द करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये एक तृतीयांश मत मिळाली होती. त्यानंतरच हे कलम रद्द झाले होते, असे सांगत त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व लोकांना संसदेतील सदस्यांसाठीसुद्धा उभे राहून त्यांचे आभार मानण्यास सांगितले.

हेही वाचा- मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती - मोदी

यावेळी, जे लोक स्वत:चा देशही व्यवस्थित चालू शकत नाही. ते लोक दहशतवादाला आश्रय देऊन त्यांचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत, हे अख्या जगाला माहिती असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तनावर अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली.

हेही वाचा- 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !

त्याचबरोबर, तुम्हाला ९/११ आणि २६/११ या दहशवादी हल्ल्यांचे कट रचणारे कोठे सापडतील, असा मोदी यांनी उपस्थिताना प्रश्न केला. आणि आता आतंकवादाला निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे देखील त्यांनी लोकांना सांगितले. त्याचबरोबर, आतंकवादाबाबत राष्ट्रपती ट्रंप यांचे भारताला भक्कम समर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.