ETV Bharat / bharat

राममंदिराच्या भूमीपुजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला धमकीचे फोन - पुजारी विजयेंद्र

पुजारी विजयेंद्र यांना धमक्या देणाऱ्या अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव येथील शास्त्रीनगरात राहणाऱ्या पुजारी विजेयंद्र यांच्या निवासस्थानी काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुजारी विजयेंद्रन
पुजारी विजयेंद्रन
author img

By

Published : Aug 4, 2020, 1:21 PM IST

लखनौ - अयोध्येतील राममंदिराच्या भूमीपुजनाचा पवित्र मुहूर्त काढणारे 75 वर्षीय पुजारी विजयेंद्र यांना फोनवरून धमक्या मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना कर्नाटकमधील बेळगाव येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

पुजारी विजयेंद्र यांना धमक्या देणाऱ्या अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव येथील शास्त्रीनगरात राहणाऱ्या पुजारी विजेयंद्र यांच्या निवासस्थानी काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राममंदिराच्या भूमीपुजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्यांना धमकी दिल्याने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या एका सदस्याने चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की ज्यांनी मुहूर्त ठरविला त्यांनाही धमक्या मिळत आहेत, हा खूप चिंतेचा विषय आहे. ज्यांना मंदिर बांधू द्यायचे नाही, त्यांना क्षमा करण्यात येणार नाही.

भूमीपूजनाचा मुहूर्त का काढला? असे एकाने फोनवरून विचारल्याचे विजयेंद्र यांनी सांगितले. तुम्ही का सहभागी झाले आहात? असेही धमकी देणाऱ्याने पुजारी विजयेंद्र यांना विचारले. आयोजकांनी विनंती केल्याने मुहूर्त काढल्याचे विजयेंद्र यांनी त्या अज्ञात व्यक्तीला सांगितले. विविध फोनवरून कॉल आले आहेत. मात्र, त्यांनी नाव सांगितले नसल्याचे विजयेंद्र यांनी माध्यमांना सांगितले.

विजयेंद्र हे राममंदिराच्या कामाशी अनेक वर्षांपासून निगडीत आहेत. रामंदिराचे बांधकाम कधी सुरू करावे, याबाबतची माहिती राममंदिर न्यासने फेब्रुवारीमध्ये पुजारी विजयेंद्रन यांना विचारली होती. राममंदिराच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित बुधवारी दुपारी होणार आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे पुजारी विजयेंद्रन हे भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.