ETV Bharat / bharat

मराठमोळे न्यायमूर्ती बोबडे नवे सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी - राष्ट्रपती कोविंद यांची न्यायमूर्ती बोबडे यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी

न्यायमूर्ती बोबडे भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, हे औपचारिकत्या जाहीर झाले आहे. ते १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदासाठी शपथ घेतील. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

न्यायमूर्ती बोबडे
author img

By

Published : Oct 29, 2019, 11:54 AM IST

Updated : Oct 29, 2019, 8:34 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या सरन्यायाधीशपदाच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे मराठमोळे न्यायमूर्ती बोबडे भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, हे औपचारिकत्या जाहीर झाले आहे. ते १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदासाठी शपथ घेतील. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

मऱ्हाटमोळे न्यायमूर्ती बोबडे पुढील सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीश रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत. शपथविधीनंतर ते सर्वोच्च न्यायालयाचे ४७ वे सरन्यायाधीश बनतील.

नागपूरच्या आकाशवाणी चौकात बोबडे यांचे घर आहे. त्यांचा जन्म नागपुरातच २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात झाला. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अ‌ॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. नागपूर विद्यापीठातून बोबडे यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली. यानंतर १९९८ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.

  • President Ram Nath Kovind signs warrant appointing Justice Sharad Arvind Bobde as the next Chief Justice of India (CJI), he will take oath on November 18th. Current CJI Justice Ranjan Gogoi retires on November 17th. pic.twitter.com/dCiALYqdj8

    — ANI (@ANI) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नागपूर व महाराष्ट्राकरिता ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व बोबडे कुटुंबीयांचे स्नेही विकास शिरपूरकर सांगतात. सम्यक बुद्धिमत्तेचे व स्थितप्रज्ञ असे न्यायमूर्ती शरद बोबडे हे तल्लख बुद्धिमत्तेचे व संतुलित वकील आहेत.

कायदेपंडित असणारे शरद बोबडे यांचे आजोबा मनोहर बोबडे यांचा अर्धाकृती पुतळा जिल्हा सत्र न्यायालयाच्या चौकात आहे. सुमारे २ महिन्यांपूर्वी शरद बोबडे हे नागपुरात महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या भूमिपूजन कार्यक्रमात आले होते. नागपुरात विधी विद्यापीठ व्हावे, यासाठी न्यायमूर्ती शरद बोबडे प्रयत्नशील होते. महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे ते कुलगुरूदेखील आहेत. कुठल्याही घटनेने डगमगून न जाणे हा शरद बोबडे यांचा स्वभाव असल्याचीही माहिती मिळत आहे.

Intro:Body:

न्यायमूर्ती बोबडे पुढील सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे न्यायमूर्ती बोबडे भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, हे औपचारिकत्या जाहीर झाले आहे. ते १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदासाठी शपथ घेतील. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 8:34 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.