नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज परराष्ट्र व्यवहारमंत्री व्ही. मुरलीधरन आणि आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता चित्राचे अनावरण करतील. याबाबत आयसीसीआरने 'अटल भारत की तस्वीर' या हँशटॅगहसह टि्वट करत माहिती दिली.
-
Few Hours To Go! Hon'ble President of India @rashtrapatibhvn in presence of@MOS_MEA & @vinay1011 will virtually unveil portrait of Late Sh. A.B.Vajpayee on his 2nd Death Anniversary at ICCR, Azad Bhawan at 1100 IST tomorrow 16Aug. Watch live here.#AtalBharatKiAtalTasveer pic.twitter.com/Z8um3vUwFD
— ICCR (@ICCR_Delhi) August 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Few Hours To Go! Hon'ble President of India @rashtrapatibhvn in presence of@MOS_MEA & @vinay1011 will virtually unveil portrait of Late Sh. A.B.Vajpayee on his 2nd Death Anniversary at ICCR, Azad Bhawan at 1100 IST tomorrow 16Aug. Watch live here.#AtalBharatKiAtalTasveer pic.twitter.com/Z8um3vUwFD
— ICCR (@ICCR_Delhi) August 15, 2020Few Hours To Go! Hon'ble President of India @rashtrapatibhvn in presence of@MOS_MEA & @vinay1011 will virtually unveil portrait of Late Sh. A.B.Vajpayee on his 2nd Death Anniversary at ICCR, Azad Bhawan at 1100 IST tomorrow 16Aug. Watch live here.#AtalBharatKiAtalTasveer pic.twitter.com/Z8um3vUwFD
— ICCR (@ICCR_Delhi) August 15, 2020
अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्ट 2018 ला अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या वाजपेयींचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वाजपेयी बऱ्याच काळापासून आजारी होते. वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी देशातल्या 100 नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. भाजपचे संस्थापकांमध्ये समाविष्ठ असलेले अटल बिहारी वाजपेयी केवळ एक प्रखर वक्ताच नव्हते तर एक शानदार कवी सुद्धा होते.
वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते. 1996 मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, त्यांचे सरकार त्यावेळी 13 दिवसच टिकले होते. तर पुन्हा 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळीही त्यांचे सरकार 13 महिनेच होते. 1999 मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळी त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तर वाजपेयी 2004 पासून प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले.