ETV Bharat / bharat

क्रुरतेचा कळस..! गर्भवती हत्तीणीला पेटती स्फोटके खायला देऊन हत्या, केरळमधील घटना - गर्भवती हत्तीणीचा मृत्यू केरळ

ही घटना सायलेंट व्हॅली परिसरातील अट्टापाडी भागात 27 मे ला घडली. शवविच्छेदनात हत्तीण गर्भवती असल्याचे पुढे आले. मात्र, मानवाच्या क्रुरतेमुळे तिचा मृत्यू झाला.

हत्तीन मृत्यू केरळ
हत्तीन मृत्यू केरळ
author img

By

Published : Jun 3, 2020, 3:55 PM IST

तिरुवअनंतपूरम(मल्लपूरम) - केरळमधील सायलेंट व्हॅली फॉरेस्टमध्ये मानवाच्या क्रुरतेमुळे एका हत्तीणीला आपला जीव गमवावा लागला. मानवी वसाहतीमध्ये आली असता पेटती फटाके अननस फळातून कोणीतीरी जाणूनबुजून तिला खायला दिली. अननस खाताच मोठा स्फोट झाला, त्यामध्ये तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तिला खातापिता येत नव्हते, त्यामुळे हत्तीण मरण पावली. ही हत्तीण गर्भवती असल्याची माहितीही वनअधिकाऱ्यांनी दिली.

सायलेंट व्हॅली फॉरेस्ट परिसरातील स्थानिक नागरिकांनीच स्फोटकाने भरलेले अननस हत्तीणीला खायला दिल्याचे शक्यता वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मल्लपूरम जिल्ह्याचे वनअधिकारी मोहन कृष्णा यांनी फेसबुकवरून या क्रूर हत्येला वाचा फोडली.

'फळ खाताना जेव्हा स्फोट झाला तेव्हा ती पुढच्या 18 ते 20 महिन्यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचाच विचार करत असावी. तोंडात स्फोट झाल्यानंतर जखमेने आणि भुकेने विव्हळत हत्तीण परिसरात फिरत होती. गंभीर जखम झाल्याने तिला खाता येत नव्हते. तिने परिसरातील कोणालाही कधीच जखमी केले नव्हते, तरी तिचा नाहक बळी घेतला गेला, असे कृष्णा म्हणाले.

पुढे कृष्णा म्हणाले की, 'जखमी अवस्थेत तशीच हत्तीण वेलियार नदीत आली. आपले तोंड आणि सोंड पाण्यात बुडवून थांबली. त्यामुळे कदाचित तिला थोडा आराम भेटला असावा. आम्ही जेव्हा तिला पाहिले तेव्हा ती नदीमध्ये तोंड बुडवून बसली होती. तिला अंतर्ज्ञान झाले असावे की, आपला मृत्यू जवळ आला आहे. तिने पाण्यातच जलसमाधी घेतली. आम्ही मृतावस्थेत हत्तीणीला बाहेर काढून अत्यंसस्कार केले. आम्ही सर्वजण या घटनेने खुप दु:खी झालो'.

ही घटना सायलेंट व्हॅली परिसरातील अट्टापाडी भागात 27 मे ला घडली. शवविच्छेदनात हत्तीण गर्भवती असल्याचे पुढे आले. मात्र, मानवाच्या क्रुरतेमुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींचा शोध घेण्याचे काम वनविभागाने सुरु केले असून प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्य वनसंरक्षक सुरेंद्रकुमार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.