ETV Bharat / bharat

'बिहार २००५ सालापासून दारिद्र्यात, मात्र नितीश कुमारांना प्रश्न विचारणारे कोणी नाही' - जनता दल युनायटेड

मागील १५ वर्षांत बिहार राज्याचा विकास झाला आहे. मात्र, ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे होतो. तो झाला नाही. इतर राज्यांच्या तुलनेत बिहार दारिद्र्यात असल्याचे ते म्हणाले.

प्रशांत किशोर
प्रशांत किशोर
author img

By

Published : Feb 18, 2020, 1:42 PM IST

Updated : Feb 18, 2020, 3:47 PM IST

पाटना - राजकीय रणनीतिकार आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाचे माजी नेते प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली आहे. २००५ सालापासून बिहार दारिद्र्यात आहे. मात्र, नितीश कुमारांना प्रश्न विचारणारे कोणीही नाही. जेडीयू पक्ष आणि भाजपमधील आघाडीवरून मतभेद असल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. ज्यांना गांधीजींच्या विचारसरणीत विश्वास वाटतो, ते गोडसेला पाठिंबा देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी कोणत्याही पक्षात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. तसेच, बिहारमध्ये कोणत्याही पक्षासाठी काम करणार नसल्याचेही सांगितले. राज्यामध्ये 'बात बिहार की' या अभियानाला त्यांनी सुरूवात केली आहे. याद्वारे ते राज्यामध्ये नेतृत्व करू शकणाऱ्या तरुणांची फळी तयार करणार आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर निशाणा साधला. दुसऱ्यांचे लांगूलचालन करून फक्त खुर्चीवर राहण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत असल्याचे ते म्हणाले.

  • Political strategist Prashant Kishor on his expulsion from JD(U): I have had good relations with Nitish Ji. I have immense respect for him. I will not question his decision. pic.twitter.com/So3zlcL1yM

    — ANI (@ANI) February 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२००४ पासून नितीश कुमार भाजपबरोबर आहेत. नितीश कुमारांनीच नरेंद्र मोदींना बिहारमध्ये विरोध केला होता. तेच आज मोदींच्या मागे उभे आहेत. प्रश्न हा आहे की नितीश कुमार कोणत्या मूल्यांवर राजकारण करत आहेत. कन्हैया कुमार हे बिहारचे सुपुत्र असून राज्यासाठी काहीतरी करू इच्छितात. मी अशा लोकांबरोबर काम करणार आहे, जे बिहारचा विकास करतील.

मागील १५ वर्षांत बिहार राज्याचा विकास झाला आहे. मात्र, ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे होतो. तो झाला नाही. इतर राज्यांच्या तुलनेत बिहार दारिद्र्यात असल्याचे ते म्हणाले. प्रशांत किशोर यांची काही दिवसांपूर्वी जेडीयू पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नितीश कुमारांनी पक्षातून काढून टाकण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • Political strategist Prashant Kishor: Arvind Kejriwal's Aam Aadmi Party stands against the Citizenship Amendment Act (CAA) and National Register of Citizens (NRC) pic.twitter.com/FQirfxIoLY

बिहारमध्ये असे नेतृत्व तयार करणार आहे, जे बिहार राज्य चांगल्या पद्धतीने चालवेल. राज्याला नवी ओळख देईल. या अभियानाद्वारे ते प्रत्येक पंचायतीपर्यंत पोहचणार आहेत. तसेच, तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरडोई उत्पन्नात बिहार २२ व्या क्रमांकावर आहे. १० व्या नंबरवर येण्यासाठी ८ पटीने जास्त काम करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एनआरसी आणि सीएएच्या विरोधात असल्याचे ते यावेळी म्हणाले. 'नितीश कुमारांशी माझे चांगले संबध असून त्यांचा मी आदर करतो. त्यांचा निर्णयावर मी प्रश्न उपस्थित करणार नाही. राज्यसभा सदस्य पवन वर्मा आणि प्रशांत किशोर यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केल्यामुळे पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

Last Updated : Feb 18, 2020, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.