ETV Bharat / bharat

नथुराम गोडसे देशभक्त; प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

कमल हसन यांनी नथुराम गोडसे याला पहिला दहशतवादी असल्याचे म्हटले होते. यानंतर याबाबतचा वाद वाढत जात असतानाच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर
author img

By

Published : May 16, 2019, 4:22 PM IST

Updated : May 16, 2019, 5:14 PM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांचा खून करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आहेत. ते देशभक्तच राहतील असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.

कमल हासन यांनी नथुराम गोडसे याला पहिला दहशतवादी असल्याचे म्हटले होते. यानंतर याबाबतचा वाद वाढत जात असतानाच प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले आहे. जे लोक नथुराम गोडसे यांना दहशतवादी म्हणतात त्यांनी एकदा आत्मपरिक्षण करायला हवे. अशा लोकांना या निवडणुकीत उत्तर मिळेल, असेही ठाकूर म्हणाल्या.

प्रज्ञासिंह ठाकूर

अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून हसन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तेव्हापासून हा आता चर्चेचा विषय ठरत आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं विधान हसन यांनी केलं होतं.

मराठी कलाकारांनीही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. अभिनेते शरद पोक्षेंनीही कमल हासन यांच्यावर निशाणा साधला होता. हिंदूं सहिष्णूवादी आहेत म्हणूनच असलं वक्तव्य खपवून घेतलं जात असं पोंक्षेंनी म्हटलं होते. दहशतवादाला धर्म नसतो, अगदीच मान्य पण, पकडलेला दहशतवादी हा मुस्लीम असतो, हे जगातलं वास्तव आहे. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णू आहे. इतिहास साक्ष आहे, की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत, असेही ते म्हणाले.

गेल्या काही वर्षात पोंक्षेंवर टीका करणारे आणि समर्थन करणारे यांच्यात नेहमीच वाद होत असतात, कमल हासन, शरद पोंक्षे आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे या वादाला नव्याने तोंड फुटले आहे.

Intro:Body:

National news 2

Conclusion:
Last Updated : May 16, 2019, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.