श्रीनगर - काश्मीरमधील पोस्ट पेड मोबाईल सेवा शनिवारी सुरू करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर फोन सेवा बंद करण्यात आली होती. तब्बल ६८ दिवसानंतर मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यात सध्या पोस्ट पेड सेवा सुरू करण्यात येणार आहे. इंटरनेट आणि प्रीपेड मोबाईल सेवेसाठी लोकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्यात जवळपास ६६ लाख मोबाईलचा वापर करणारी लोक आहेत. त्यामध्ये ४० लाख लोक पोस्ट पेड सेवा घेतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नुकतेच राज्यात पर्यटकांना येण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर आज राज्यात पोस्टपेड मोबाईल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान जम्मूत आगस्ट महिन्यामध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, इंटरनेटचा दुरउपयोग झाल्याने सेवा १८ दिवसानंतर पुन्हा बंद करण्यात आली होती.