ETV Bharat / bharat

भारत-अमेरिका चर्चा : अजित डोवालांची पॉम्पिओ, एस्पर यांच्याशी महत्त्वाची बैठक

author img

By

Published : Oct 27, 2020, 5:24 PM IST

Updated : Oct 27, 2020, 5:42 PM IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही सखोल चर्चा केली. अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका आठवड्यावर आली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भारतभेट महत्त्वाची समजली जात आहे.

अजित दोवाल पोम्पेओ भेट
अजित दोवाल पोम्पेओ भेट

नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पॉम्पिओ आणि एस्पर यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही सखोल चर्चा केली. अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका आठवड्यावर आली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भारत भेट महत्त्वाची समजली जात आहे.

NSA Doval
अजित दोवालांची पोम्पेओ, एस्पर यांच्याशी महत्त्वाची बैठक

प्रादेशिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून वाद सुरू आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यासोबतच दक्षिण चिनी समुद्रात चीनची दादागिरी सुरू आहे. तैवान आणि हाँगकाँगवर चीनची दडपशाही सुरू आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीन वर्चस्व गाजवू पाहत असताना त्यास अमरिकेने विरोध केला आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणाविरोधात अमेरिकेने कठोर धोरण स्वीकारले आहे.

भारत व अमेरिकेत सामरिकदृष्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत अमेरिकेत सहकार्य पुढे नेण्यासाठी चर्चा झाली. २+२ मंत्री स्तरावर चर्चा झाल्यानंतर अमेरिकेच्या दोन्ही नेत्यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली.

NSA Doval
अजित डोवालांची पॉम्पिओ, एस्पर यांच्याशी महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चीन सीमावादातील भूमिका

सीमावादावर तोडगा निघत नसल्याने भारत आणि चीनमध्ये विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली होती. भारतातर्फे विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते. भारत-चीन सीमावादात भारताला पाठिंबा देण्याचे वक्तव्य पोम्पिओ यांनी केले. त्यामुळे अजित डोवाल यांच्याबरोबरच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.