हवेचे प्रदूषण आणि हवेच्या दर्जाचे मानक खालावल्याने लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सध्याची स्थिती याचा पुरावा आहे. मानवाने सुरू केलेल्या राष्ट्रीय साधनसंपत्तीच्या बेसुमार उपभोगामुळे पर्यावरण गंभीर धोक्याला सामोरे जात आहे. १५३ देश आणि ११,२५८ वैज्ञानिकांचा समावेश असलेल्या एका आंतरराष्ट्रीय समितीने हवामान आणीबाणी घोषित केली आहे. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, वाढते जागतिक तापमान, झपाट्याने वितळणाऱ्या हिमनद्या, समुद्राची वाढती पातळी हे पर्यावरणावर गंभीर परिणाम करून त्याचे विपरीत परिणाम होणार आहेत. शहरीकरण, विकास आणि औद्योगीकीकरणाच्या नावाखाली जंगलतोड निसर्गाचा समतोल बिघडवत आहे. मानवी वस्तीच्या अगदी पूर्वीच्या वर्षात मानव शिकार गोळा करणारा होता. मानवी वंशाच्या विकासाच्या प्रवाहात त्याने आपल्या गरजांसाठी निसर्गाचा विनाश सुरू केला आहे. पर्यावरणात हरितगृह वायूंचे बेसुमार उत्सर्जन हवेला तसेच पाणी आणि अन्नालाही प्रदूषीत करत आहे.
दिल्ली आणि आसपासच्या भागांतील हवेच्या दर्जाचा निर्देशांकाचा धोकादायक स्तर धोक्याची घंटी वाजवत आहेत. भौगोलिक स्थिती फारच थोडी भूमिका निभावत असली तरीही, या अरिष्टात मानव निर्मित घटक प्रमुख जबाबदार आहेत. दिवाळीचे फटाके आणि भाताचे तूस जाळण्याने दिल्लीत हवेचा दर्जा निर्देशांक ५०० या धोकादायक स्तरावर गेला. एक्यूआय ४०० ते ५०० च्या दरम्यान असेल तर तो धोकादायक समजला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाने असे सांगितले की, ५०० पेक्षा जास्त असलेला एक्यूआय अत्यंत घातक असतो. हवेचा दर्जा खालावत असतानाच, दिल्लीतील दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. मुखवटे घातल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नाहीत, ज्यावरून शहरातील भयानक स्थितीचे प्रतिबिंब दिसते. दिल्लीच नव्हे तर गुरूग्राम, गाझियाबाद, नोइडा, फरीदाबाद ही सर्व शहरे हवेच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगढ आणि तेलंगणा ही काही राज्ये विषारी उत्सर्जनाचे आघात सोसत आहेत. अगोदरच संकट असलेल्या स्थितीत हवामान बदलामुळे आणखी स्थिती खराब केली आहे. हिवाळ्यातील धुक्यासोबत वाहनांतून तसेच उद्योग आणि शेतातून होणारे उत्सर्जन लोकांचा श्वास गुदमरवून टाकत आहे.
हेही वाचा : मृत्यूला आमंत्रण देणारा धूर..
पंजाब आणि हरियाणा, जे दिल्लीचे शेजारी राज्य आहेत ते कृषीदृष्ट्या विकसित आहेत. या दोन राज्यात पिकाचे उत्पादन खूप जास्त असते. त्यामुळे धान्याचे खुंट जाळण्याचे प्रमाण जास्त असते. सहसा एक टन राब जाळल्यास ६० किलो कार्बन मोनॉक्साईड आणि १४०० किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. ३ किलो सूक्ष्म धुलीकण, राख आणि सल्फर डायऑक्साईड यांचे अतिरिक्त उत्सर्जन वातावरणात होते. वार्षिक, अर्ध्यापेक्षा जास्त जाळलेले पीक पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे आहे. ज्याचा दिल्लीवर नकारात्मक परिणाम होत आहे. हिवाळी मोसमात याचे परिणाम दुप्पट होतात. पीक जाळण्याने जमिनीची उत्पादकता कमी होते. बेसुमार धान्याचे खुंट जाळल्याने लाभदायक सुक्ष्म जंतू नष्ट होतात. जमिनीतील ओल कमी होते. ज्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनात घट होण्यात होतो. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने ४ वर्षांपूर्वी राब जाळण्याच्या विरोधात इशारा दिला होता. मात्र, त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने जागतिक तापमान वाढणार आहे. हवेचे प्रदूषण बेसुमार होणार आहे. हवेच्या प्रदूषणामुळे देशभरात २३ टक्के मृत्यू झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संघाच्या अहवालानुसार, ८ पैकी एका नागरिकाचा मृत्यू प्रदूषित हवेमुळे होतो. एम्सने फुफ्फुसाचे आणि हृदयाचे विकार दिल्लीत वाढणार असल्याचा इशारा दिला होता, जेथे हवेचा दर्जाबाबत तडजोड केली गेली आहे. एक्यूआयबाबत केलेल्या पाहणीत, भारत शेवटच्या क्रमांकावर आहे. भारतातील दोन तृतीयांश शहरे गॅस चेंबर झाली आहेत.
पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी पर्यायी पद्धती अंमलात आणल्या पाहिजे. पारंपरिक उर्जा व्यवस्थेत, पिकाचे धान्याचे खुंट ज्वलनात घट करू शकते. हवेचा दर्जा जेथे अत्यंत खराब आहे, तेथे शेतकऱ्यांना गहू आणि तांदळाऐवजी बाजरीची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. दिल्लीतील वाहनांतून होणारे उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी, समविषमपेक्षा आणखी परिणामकारक पद्धतीचा विचार केला पाहिजे. सार्वजनिक परिवहन मजबूत केलेच पाहिजे. जे उद्योग विषारी वायूचे उत्सर्जन करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. प्रदूषणाच्या भयानक परिणामांबद्दल समाजाला जागृत केले पाहिजे. ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि कॅनडा या देशांमध्ये हवेचा दर्जा उत्कृष्ट आहे. भारताने त्यांचे अनुकरण करून अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली पाहिजेत.
हेही वाचा : हवेतील सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण भारताला ढकलतेय धोकादायक स्थितीत