पाटणा - नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज सातव्यांदा शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत 14 मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यापूर्वी नितीश कुमारांनी 6 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नितीश कुमार 7 वेळा झाले मुख्यमंत्री -
3 मार्च 2000 रोजी 29 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
नोव्हेंबर 2005 मध्ये 31 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
नोव्हेंबर 2010 मध्ये 32 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
फेब्रुवारी 2015 मध्ये 34 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
नोव्हेंबर 2015 मध्ये 35 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
जुलै 2017 मध्ये 36 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
16 नोव्हेंबर 2020 रोजी 37 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
नितीशकुमार यांची थोडक्यात ओळख -
- बिहारमधील पटना अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त झालेल्या नितीशकुमार यांचा जन्म 1951 मध्ये बिहारमधील कुर्मी कुटुंबात झाला.
- नितीश यांचे टोपणनाव मुन्ना आहे.
- जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, कर्पूरी ठाकूर आणि जॉर्ज फर्नांडिस हे नितीश यांचे राजकीय गुरू होते.
- 22 फेब्रुवारी 1973 रोजी नितीशकुमारचे व्यवसायाने अभियंता मंजू कुमारी सिन्हाशी लग्न झाले.
- 1977 साली नितीशकुमार यांनी राजकारणात प्रवेश केला. यावर्षी नितीश यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर प्रथम विधानसभा निवडणूक लढविली.
- 1985 मध्ये नितीश बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
- नितीश यांचा राजकीय हळूहळू विस्तार वाढत गेला. दरम्यान, 1987 मध्ये नितीशकुमार बिहारमधील युवा लोक दलाचे अध्यक्ष झाले.
- 1989 मध्ये नितीशकुमार यांना जनता दलाचे (बिहार) सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- नितीश यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी 1989 हे वर्ष लाभदायी ठरले. यावर्षी नितीश लोकसभेवर निवडून गेले. लोकसभेतील नितीश यांचा हा पहिलाच कार्यकाळ होता.
- यानंतर 1990 मध्ये नितीश एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत केंद्रीय कृषी व सहकार राज्यमंत्री होते.
- 1991 मध्ये दहाव्या लोकसभेत ते पुन्हा एकदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले.
- 1991 मध्ये नितीशकुमार जनता दलाचे सरचिटणीस झाले आणि संसदेत जनता दलाचे उपनेते बनले. त्यानंतर 1993 मध्ये ते कृषी समितीचे अध्यक्ष झाले.
- नितीशकुमार 1996 मध्ये अकराव्या लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1996 ते 1998 या काळात संरक्षण समितीचे सदस्य होते.
- 1998 मध्ये नितीश पुन्हा 12 व्या लोकसभेवर निवडून गेले.
- 1998 ते 1999 पर्यंत नितीशकुमार केंद्रीय रेल्वेमंत्री होते.
- 1999 मध्ये नितीशकुमार 13 व्या लोकसभेवर निवडून गेले. यानंतर त्यांना केंद्रीय कृषिमंत्री करण्यात आले.
बिहारची सत्ता -
- वर्ष 2000 हे नितीश यांच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात महत्त्वाचे वळण देणार ठरले. यावर्षी नितीशकुमार प्रथमच बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा कार्यकाळ फक्त 8 दिवसांचा होता. 3 मार्च 2000 ते 10 मार्च 2000 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
- त्यानंतर नितीश यांना सन 2000 मध्येच पुन्हा केंद्रीय कृषिमंत्री बनविण्यात आले.
- 2001 मध्ये नितीश यांना रेल्वेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
- 2001 ते 2004 या काळात नितीश केंद्रीय रेल्वेमंत्री होते.
- 2004 साली नितीश 14 व्या लोकसभेवर निवडून गेले.
प्रथमच 5 वर्षांसाठी सत्ता मिळाली -
- 2005 मध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्री झाले. 31 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. नितीश यांचा कार्यकाळ 24 नोव्हेंबर 2005 ते 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत होता.
- 26 नोव्हेंबर 2010 रोजी पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्री झाले.
- 25 नोव्हेंबर 2010 ते 19 मे 2014 पर्यंत त्यांचा तिसरा कार्यकाळ होता.
- नितीशकुमार यांनी 22 फेब्रुवारी 2015 रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश यांचा हा कार्यकाळ 19 नोव्हेंबर 2015 रोजी संपुष्टात आला.
- 20 नोव्हेंबर 2015 रोजी महायुतीत सामील होत, त्यांनी 35 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी ते 26 जुलै 2017 पर्यंत मुख्यमंत्री होते.
- यानंतर नितीशकुमार यांना एनडीए प्रवेश केला. 27 जुलै 2017 रोजी भाजपबरोबर सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली.
- आज पुन्हा एनडीएसोबत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले आणि नितीश बिहारचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.