चंदीगढ - पंजाबच्या पटियाला जिल्ह्यामध्ये निहंगांच्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले. यामध्ये एका पोलिसाचा हातही कापला गेला आहे. बाहेर फिरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून या व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला केल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निहंगा जमातीचे चार ते पाच लोक गाडीने प्रवास करत होते. पहाटे सहाच्या सुमारास मंडी बोर्ड पोलिसांनी त्यांना अडवून, बाहेर फिरण्यासाठीच्या पासबाबत विचारणा केली. त्यांना थांबण्यास सांगितले असता, त्यांनी बॅरिकेट्सवर सरळ गाडी धडकवली, आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलिसाचा हातही कापला गेला. पटियालाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनदीप सिंग सिंधू यांनी याबाबत माहिती दिली.
-
In an unfortunate incident today morning, a group of Nihangs injured a few Police officers and a Mandi Board official at Sabzi Mandi, Patiala. ASI Harjeet Singh whose hand got cut-off has reached PGI Chandigarh.
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In an unfortunate incident today morning, a group of Nihangs injured a few Police officers and a Mandi Board official at Sabzi Mandi, Patiala. ASI Harjeet Singh whose hand got cut-off has reached PGI Chandigarh.
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) April 12, 2020In an unfortunate incident today morning, a group of Nihangs injured a few Police officers and a Mandi Board official at Sabzi Mandi, Patiala. ASI Harjeet Singh whose hand got cut-off has reached PGI Chandigarh.
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) April 12, 2020
यामध्ये एका सहाय्यक उपनिरिक्षकाचा हात तलवारीच्या हल्ल्यात कापला गेला. तसेच पटियाला सदरचे स्टेशन हाऊस अधिकारी यांच्या हाताच्या कोपरावर जखम झाली. यासोबतच आणखी एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला जखम झाल्याची माहिती सिंधूंनी दिली. यानंतर हल्लेखोर निहंग्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर, जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या हल्लेखोरांना शोधण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पंजाब सरकारने 800 हून अधिक परदेशी नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवले