तामिळनाडू - येथील तामपुधुकोत्त्याई जिल्ह्यातील अनुराधा यांनी ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या 87 किलो वजन गटातील वेटलिफ्टींग या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अनुराधा तंजौर जिल्ह्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्या तामिळनाडू येथील त्रिची विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी अनुराधा यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, नातेवाईक आणि चाहत्यांनी भव्य स्वागत केले.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्ण पदक मिळविले. मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्याकडे प्रचंड कौशल्य आहेत. मात्र, आपल्याकडे योग्य कोचिंग सुविधा नाही.