नवी दिल्ली - हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्या एका छोट्या कारखान्याला ताळे ठोकले आहे. पूर्वोत्तर दिल्लीतील खजुरी खास भागात आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांचे घर आणि छोटा कारखाना आहे. तसेच दयालपूर पोलीस ठाण्यात आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्याविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
-
Police seals a factory belonging to AAP Councillor Tahir Hussain in North East Delhi's Khajoori Khaas area. #DelhiViolence pic.twitter.com/SL7r90AFiM
— ANI (@ANI) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Police seals a factory belonging to AAP Councillor Tahir Hussain in North East Delhi's Khajoori Khaas area. #DelhiViolence pic.twitter.com/SL7r90AFiM
— ANI (@ANI) February 27, 2020Police seals a factory belonging to AAP Councillor Tahir Hussain in North East Delhi's Khajoori Khaas area. #DelhiViolence pic.twitter.com/SL7r90AFiM
— ANI (@ANI) February 27, 2020
गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येत ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताहीर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचे अंकित शर्मा यांच्या वडिलांनी म्हटले आहे. मात्र, ताहीर हुसेन यांनी हा आरोप फेटाळून लावला असून घाणेरड्या राजकारणात आपल्याला ओढले जात असल्याचे म्हटले आहे.
25 फेब्रुवारीला ताहीर हुसेन यांच्या घरावरून दंगलखोरांनी दगडफेक केली होती, असा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच हुसेन यांच्या घराच्या छताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, आणि मोठे दगड आढळून आले आहेत. दरम्यान, ताहीर हुसेन यांनी आरोपांचे खंडन केले आहे. हिंसाचारावेळी मी घरामध्ये उपस्थित नव्हतो, असे ताहीर यांनी म्हटले आहे. मला बदनाम करण्यासाठी हा सर्व कट रचला असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, हिंसाचारामध्ये आम आदमी पक्षाचा व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला शिक्षा देण्यात यावी. हिंसेवर राजकारण न करता, जो दोषी असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ईशान्य दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून 36 झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.