ETV Bharat / bharat

एक महिन्याच्या तान्ह्या बाळाची पैशांसाठी विक्री, ओडिशातील धक्कादायक प्रकार - अर्भक विक्री

चरमाल पोलीस ठाणे क्षेत्रातील केऊटीबहाल गावात राहणाऱ्या एका कुटुंबाने आपले एक महिन्याचे लहान बाळ कुसापाली गावात राहणाऱ्या दुसऱ्या दाम्पत्याला १५ हजार रुपयांना विकले होते. १ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

baby sold
लहान मुलाची विक्री
author img

By

Published : Oct 28, 2020, 5:04 PM IST

भुवनेश्वर - ओडिशातील संबळपूर जिल्ह्यात एक महिन्याच्या तान्ह्या मुलीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी १५ हजार रुपयांना मुलीला विकले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बाळाची सुटका केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, चरमाल पोलीस ठाणे क्षेत्रातील केऊटीबहाल गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याने एक महिन्याचे लहान बाळ कुसापाली गावात राहणाऱ्या दुसऱ्या दाम्पत्याला १५ हजार रुपयांना विकले होते. १ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

चाईल्ड लाइनने केली तक्रार दाखल

मुल विक्री प्रकरणाची माहिती मिळताच लाईल्ड लाइन स्वयंसेवी संस्थेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेअरियाखोल आणि चरमल पोलिसांच्या संयुक्त पथकाने कुसापाली गावात छापा टाकला. तेथून मुलीला ताब्यात घेतले. लहान बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गरीबीमुळे विक्री केल्याचा संशय

ज्या दाम्पत्याने एक महिन्याच्या तान्ह्या बाळाची विक्री केली त्यांना सहा मुले आहेत. तसेच हे कुटुंब गरीब असून पैशासाठी बाळाची विक्री केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.