जैसलमेर - कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. अशावेळी लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधली आहे. जैसलमेर शहरातील लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी पोलीस एका तरुणाने बनविलेल्या हेल्मेटचा वापर करत आहे.
हे हेल्मेट डोक्यावर परिधान करून पोलीस कर्मचारी गाणे गात लोकांमध्ये जागृती करत आहेत. हेल्मेटची निर्मिती करणारा तरुण आवडरामचे म्हणणे आहे, की देशात व राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु अजूनही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. लोक विनाकारण घराबोहर पडून रस्त्यांवर फिरत आहेत.
अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षक किरण कंग यांच्या सांगण्यावरून त्याने हे कोरोना मॉडल हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेटचा आकार कोरोना व्हायरसची प्रतिकृती वाटतो. हे हेल्मेट डोक्यावर घालून वाहतूक पोलीस लोकांना कोरोनाबाबत जागृत करून त्यांना घरात राहण्यासाठी समजावत आहेत.