ETV Bharat / bharat

'मरकझ' कारवाईतील 7 पोलीस 'क्वारंटाईन', 11 पोलिसांनी केले मुंडण - Etv bharat news delhi

निजामुद्दीन स्थित 'मरकझ'मधून लोकांना बाहेर काढण्याचे रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. हे काम सोमवारी व मंगळवारीही झाले. एकीकडे दिल्ली सरकार या लोकांना बाहेर काढत असताना त्यामध्ये निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे पोलीसही त्यामध्ये सहभागी होते. या कारवाईत पोलीस कर्मचार्‍यांनी महत्वाची भूमिका बजावली.

delhi
मरकज कारवाईतील 7 पोलीस 'क्वारंटाईन
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:11 PM IST

नवी दिल्ली - निजामुद्दीनमध्ये असलेल्या 'मरकझ'मधून पोलीस आणि प्रशासनाने 2 हजार 300 हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. या कारवाईत सामील झालेल्या निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या 11 पोलिसांनी मुंडण केले आहे. त्याचबरोबर 7 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मरकज कारवाईतील 7 पोलीस क्वारंटाईन
  • पोलिस कर्मचार्‍यांनी बजावली महत्वाची भूमिका -

मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन स्थित 'मरकझ'मधून लोकांना बाहेर काढण्याचे रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. हे काम सोमवारी व मंगळवारीही झाले. एकीकडे दिल्ली सरकार या लोकांना बाहेर काढत असताना त्यामध्ये निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे पोलीसही त्यामध्ये सहभागी होते. या कारवाईत पोलीस कर्मचार्‍यांनी महत्वाची भूमिका बजावली.

  • 11 पोलिसांनी केले मुंडण -

लोकांना येथून बाहेर काढण्याचे काम तीन दिवस सुरू होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली होती. तरीही काही पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळे 11 पोलिसांनी दाढी करून केसही कापले आहेत. केस कापल्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा त्यांचा समज आहे.

निजामुद्दीन पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 7 पोलिसांना क्वारंटाईनमधून सोडण्यात आले आहे. ते मरकज कारवाईत सहभागी होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.