नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारमध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दगडफेक आणि गोळीबार सुरू असताना अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी रतन लाल यांचा मृत्यू झाला होता.
सलीम मालिक, जलालुद्दीन, आयूब यूनूस, आरिफ मोहम्मद, दानिश आणि सलीम खान अशी आरोपींची नावे आहेत. यातील दानिश हा उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. दिल्ली हिंसाचारात ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर विषेश तपास पथक आणि दिल्ली गुन्हे शाखेने दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे. आत्तापर्यंत ५३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ हजार ६४७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.