नवी दिल्ली - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 'रविवारी सर्वांनी एकत्र येत रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावा, असे अवाहन मोदींनी केले आहे.
-
Watch Live! https://t.co/4L0RNdErNd
— PMO India (@PMOIndia) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Watch Live! https://t.co/4L0RNdErNd
— PMO India (@PMOIndia) April 3, 2020Watch Live! https://t.co/4L0RNdErNd
— PMO India (@PMOIndia) April 3, 2020
आज देशव्यापी लॉकडाऊनला 9 दिवस पूर्ण होत आहेत. देशात जरी लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नसून १३० कोटी लोक एकत्र आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच 5 एप्रिलला सर्वांनी रात्री 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून घरातील दारासमोर, गँलरीमध्ये मेणबत्ती, दिवा, बँटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट सुरु ठेवा.या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, मात्र, यावेळी सर्वांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे आणि घराबाहेर पडू नये, असेही मोदी म्हणाले.
प्रशासनाने आणि जनतेने एकत्रपणे परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आपल्याकडे जनता जनार्दन हे एक देवाचे रुप आहे, असे म्हटले जाते. जेव्हा देश मोठी लढाई लढत असेल, तेव्हा जनतेने आपली शक्ती दाखवली पाहिजे. यातून आपल्याला मनोबल आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी उर्जा मिळते, असे मोदी म्हणाले.
सोशल डिस्टसिंगचे पालन करून आपल्या सर्वांना एकत्र येत कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्यामुळे कोणीही सोशल डिस्टॅन्सिंगची लक्ष्मण रेखा कधीही ओलांडू नका. कारण, कोरोना साखळी तोडण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. आपली उत्साह आणि प्रेरणेपेक्षा जगात दुसरी कोणतीच शक्ती मोठी नाही, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.