ETV Bharat / bharat

'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'

author img

By

Published : Nov 21, 2020, 12:10 PM IST

Updated : Nov 21, 2020, 1:13 PM IST

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ज्या लोकांना 'सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी'ची भावना असते, असेच लोक आयुष्यात यशस्वी असतात. तेच लोक आयुष्यात जबाबदारीपूर्वक काहीतरी करतात. जे अपयशी असतात, ते 'सेन्स ऑफ बर्डन'मध्ये राहणारे असतात. 'जबाबदारीची जाणीव' ही भावना एखाद्या व्यक्तीच्या जीवनात 'नवीन संधीच्या जाणीवेला' देखील जन्म देते.'

पंतप्रधान मोदी न्यूज
पंतप्रधान मोदी न्यूज

गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठात आज मोनोक्रिस्टलाइन सौर फोटो व्होल्टाइक पॅनेलच्या 45 मेगावॅट वीजनिर्मिती केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी झालेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ज्या लोकांना 'सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी'ची भावना असते, असेच लोक आयुष्यात यशस्वी असतात. तेच लोक आयुष्यात जबाबदारीपूर्वक काहीतरी करतात. जे अपयशी असतात, ते 'सेन्स ऑफ बर्डन'मध्ये राहणारे असतात. 'जबाबदारीची जाणीव' ही भावना एखाद्या व्यक्तीच्या जीवनात 'नवीन संधीच्या जाणीवेला' देखील जन्म देते.'

पं. दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. 'आपण अशा उद्योगात प्रवेश करत आहात, जेथे सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या साथीच्या आजारामुळे जगातील उर्जा क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या वेळी, उद्योजकता आणि रोजगाराच्या विकासासाठी बर्‍याच संधी आहेत,' असे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सोलर फोटो मोनोक्रिस्टलाईन व्होल्टॅईक पॅनेल 45 मेगावॅट विजेचे उत्पादन करणाऱ्या प्लँटचे पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ येथे ई-उद्घाटन केले.

'जबाबदारीची जाणीव असलेले लोकच जीवनात यशस्वी होतात'

'सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी'ची भावना (जबाबदारीची जाणीव)

पंतप्रधान मोदींनी आज तरुण आणि नवउद्योजकांसह देशभरातील नागरिकांना देश आणि देशातील इतर नागरिकांच्या प्रती कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे म्हटले. 'आपल्या यशात आई-वडील, शिक्षक, महाविद्यालय आणि स्वतःच्या परिश्रमांशिवायही अनेकांचा वाटा असतो. अगदी गरिबातल्या गरिबाचाही वाटा असतो. त्यांचाही तुमच्या प्रयत्नांना आणि यशाला हातभार लागलेला असतो. यामुळे आपण त्या लोकांचेही ऋणी आहोत. हे आपल्यासाठी समाजाचे आणि देशाचे ऋण असते. ते फेडण्यासाठी काही तरी केले पाहिजे, ही जाणीव आपल्यातील प्रत्येकाला असली पाहिजे,' असे ते मोदी म्हणाले.

'क्लीन स्लेट'ची (कोरी पाटी) आणि 'क्लीन हार्ट'चीही (स्वच्छ हेतू) गरज

'मानवी जीवनासाठी गती प्रगती अनिवार्य आहे. तसेच, भावी पिढीसाठी निसर्ग आणि पर्यावरणाची जतन करणेही आवश्यक आहे. यासाठी आपल्याला क्लीन एनर्जीची गरज आहे. यासह आपल्याला 'क्लीन स्लेट'ची (कोरी पाटी) आणि 'क्लीन हार्ट'चीही (स्वच्छ हेतू) गरज आहे. तरच आपल्याला नवनवीन कल्पना सुचू शकतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे मार्ग सापडतात. यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आणि विविध समस्यांचे समाधान शोधण्यासाठी विविध कोनांतून विचार करणे आवश्यक आहे. काही लोक 'जसे चालत आले आहे, तसेच चालत राहणार, काही बदल घडणार नाही' असा विचार करत असतात. ही सर्व हरलेल्या मानसिकतेची लक्षणे आहेत. अशा प्रकारच्या विचारांमुळे बुद्धीला गंज चढतो. मग असे लोक तशाच मानसिकतेसह त्यांची सर्व कामे करत राहतात. नवीन मार्गांसाठी, प्रगतीसाठी ते स्वतःच स्वतःसाठी दरवाजे बंद करतात. आपण सर्वांनी असे पूर्वग्रह (प्री कन्सिव्ह्ड नोशन्स) स्वतःमध्ये तयार होऊ देणे टाळले पाहिजे. तसेच, 'हे बदलणार नाही,' अशी भावना घेऊन जगणाऱ्या लोकांच्या मनातली दगडावरची रेघ पुसली पाहिजे,' असे पंतप्रधानांनी तरुणांना सांगितले.

Last Updated : Nov 21, 2020, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.