ETV Bharat / bharat

कोरोना विषाणूला घाबरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून कुणीही घाबरू नये, असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी विषाणूची लागण होऊ नये, यासाठी काही प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत.

पंतप्रधान
पंतप्रधान
author img

By

Published : Mar 4, 2020, 8:07 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून कुणीही घाबरू नये, सर्वांनी मिळून एकत्र कार्य करावे, असे आवाहन केले आहे.

  • There is no need to panic. We need to work together, take small yet important measures to ensure self-protection. pic.twitter.com/sRRPQlMdtr

    — Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना विषाणू संबधित परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला. विषाणूवर देशातील मंत्री आणि राज्य एकत्र काम करत आहेत. भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी होत असून त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. आपल्या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच त्यांनी विषाणूची लागण होऊ नये, यासाठी काही प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत.

भारतात सध्या दिल्ली, तेलंगाणा आणि जयपूरमध्ये मिळून कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. तसेच, तेलंगाणा आणि नोएडामध्ये आणखी संशयित आढळले आहेत. कोरोना बाधित देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांना ते निरिक्षणाखाली ठेवत आहेत.

चीनच्या वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा कहर अजून सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराचे नाव आता COVID-19 केले आहे. यामध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या विषाणूचा संसर्ग झाल्याचे सर्वांत प्रथम निदर्शनास आल्याचा उल्लेख आहे. या विषाणूचे संक्रमण जवळजवळ जगभरात पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.